Devendra Fadnavis on Uddhav Thackeray | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मुख्यमंत्र्यांचा समाचार; म्हणाले..

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis on Uddhav Thackeray | येथील बीकेसी मैदानात झालेल्या सभेमध्ये मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर (BJP) निशाणा साधला होता. याशिवाय त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांचाही समाचार घेतला होता. आता या टीकेला फडणवीस यांनी चोख उत्तर दिले आहे. रविवारी गोरेगाव येथील नेस्को मैदानात ‘हिंदी भाषी महासंकल्प सभा’ होती. त्या सभेत बोलताना फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत पहाटेच्या शपथविधी बाबतचा उल्लेख करत निशाणा साधला. (Devendra Fadnavis on Uddhav Thackeray)

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

बीकेसी मैदानातील सभेत उद्धव ठाकरे म्हणाले की, ”देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) सहभाग नव्हता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून सर्वात प्रथम जनसंघ वाले फुटले. 25 वर्षे युतीमध्ये शिवसेना सडली. अशी टीका करत यांचा हिंदुत्त्वाचा बुरखा फाटला आहे. भेसूर चेहरा सर्वांना दिसला असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. अजित पवार यांच्यासोबत झालेल्या पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख करत आम्ही काँग्रेससोबत गेलो पण हातातला भगवा सोडला नाही. जे काही आम्ही केलं ते उघडपणे केल. पण पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता तर भाजपवाल्यांच्या मांडीला मांडी लावून नवाब मलिक Nawab Malik) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) बसले असते,” असेही ते म्हणाले. (Devendra Fadnavis on Uddhav Thackeray)

फडणवीसांनी दिलं उत्तर..

देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरे यांच्या आरोपांना चोख उत्तर दिले आहे. ते म्हणाले, ”सकाळचा शपथविधी जर यशस्वी झाला असता, तर माझ्या मंत्रिमंडळातील कुण्या अनिल देशुमख किंवा नवाब मलिकची हिंमत झाली नसती,” असा टोला लगावत दाऊदच्या सहकाऱ्यांसोबत ज्यादिवशी बसायची वेळ आली असती त्या दिवशी सत्ता सोडून घरी बसलो असतो.” असे फडणवीस म्हणाले.

”मी नगरसेवक आणि वकील असताना अयोध्येला गेलो होतो. गोळ्या लाठ्यांची पर्वा न करता आंदोलनात सहभागी झालो होतो. बाबरी पडायला गेलो होतो. मग तुम्हाला का मिरची लागली? असा प्रश्न करत एका गाण्याच्या बोलण्याचाही फडणवीस यांनी वापर केला. मी सामान्यांशी जोडलेला कार्यकर्ता असल्याने आज इथपर्यंत पोहोचलो आहे. तुमच्या सारखं तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलो नाही. पाठीत खंजीर खुपसून जर माझे राजकीय महत्त्व कमी होईल असे वाटत असेल तर ते विसरून जा. तुमच्या सत्तेचा ढाच्या पाडल्याशिवाय राहणार नाही,” असा इशाराही फडणवीस यांनी दिला.

Web Title : Devendra Fadnavis on Uddhav Thackeray | morning oath taking by
bjp and ncp devendra fadnavis slams cm uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

EPFO | पीएफ खात्यासाठी ऑनलाईन नोंदवा नॉमिनी, ईपीएफओने सांगितली पद्धत; जाणून घ्या

 

Maharashtra Weather Forecast | महाराष्ट्रातील ‘या’ 9 जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता – IMD

 

Petrol-Diesel Prices Today | कच्च्या तेलाच्या दरात वाढ; आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?, जाणून घ्या

 

Visceral Body Fat | व्हिसरल फॅट सर्वात धोकादायक ! जाणून घ्या कोणती चरबी तुमच्या शरीरात साठवली जाते

 

Pune News | पुण्यातील आजी आता 75 वर्षानंतर जाणार पाकिस्तानातील आपल्या घरी…हृदयाच्या कोपर्‍यात नेहमी होते रावळपिंडी