Devendra Fadnavis | ‘उद्धव ठाकरे कुणाही सोबत बसायला तयार’, देवेंद्र फडणवीसांची ठाकरेंवर टीका (व्हिडिओ)

Devendra Fadnavis | 'Uddhav Thackeray is ready to sit with anyone', Devendra Fadnavis criticizes Thackeray
File Photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Punjab CM Bhagwant Mann) यांनी बुधवारी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मातोश्रीवर (Matoshree) भेट घेतली. यावेळी विरोधी पक्षांच्या आघाडीवर सविस्तर चर्चा झाली. या भेटीनंतर तिन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे हे कुणाही सोबत बसायला तयार आहेत, यावरुन भाजपची ताकद किती आहे हे त्यांना समजलं आहे, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

 

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, मला अतिशय आनंद आहे की केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली आणि त्यांना एकमेकांची गरज लागते आहे. भाजपला (BJP) पराभूत करण्यासाठी अरविंद केजरीवाल कुणाही सोबत जायला तयार आहेत. उद्धव ठाकरे हे कुणाही सोबत बसायला तयार आहेत. यावरुनच भाजपची ताकद किती आहे त्यांना समजलं आहे. 2019 लाही असा प्रयोग करुन झाला आहे. विविध विधानसभांमध्येही हा प्रयोग करण्यात आला आहे. मात्र, असा प्रयोग तेव्हाही यशस्वी झाला नाही आणि आताही यशस्वी होणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

लोकशाहीमध्ये कावीळ झाल्यासारखं वागणं…

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, लोकशाहीमध्ये काविळ झाल्यासारखं वागण हे अत्यंत अयोग्य आहे.
नवीन संसद भवन (New Parliament Building) या देशाची शान आहे, या देशाची ताकदही आहे.
जेवढ्या कमी वेळेत हे संसद भवन जेवढ्या भव्यतेने बनलं आहे, जगासमोर भारताची ताकद आली आहे.
मोदीजींना विरोध करण्याचा त्यांना ज्वर चढला आहे, असे लोक लोकशाहीच्या (Democracy) मंदिराच्या उद्घाटनालाही जात नाहीत,
ते कारणं सांगत आहेत ती हस्यास्पद असल्याची टीका फडणवीसांनी केली.

 

 

 

Web Title :  Devendra Fadnavis | ‘Uddhav Thackeray is ready to sit with anyone’,
Devendra Fadnavis criticizes Thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Total
0
Shares
Related Posts