धुळे : 12 पत्थर चौकातून चोरट्यांनी लांबविला वकिलाचा मोबाईल

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शहर हद्दीत मोबाईल चोरांचा धुमाकुळ सुरुच सायंकाळी बारा पत्थर चाैक परिसरात वकीलाचा मोबाईल धुम स्टाईलने चोरुन नेला.

सविस्तर माहिती की, नेर गावाहुन काही कामानिमित्त वकिल योगेश दिलीप सोनवणे हे धुळे शहरात बारा पत्थर चौकात बस मधुन आले.बस मधुन खाली उतरून चोकातून रस्त्याने पायी चालत जात असताना दोन अज्ञात तरुण मोटरसायकलवर पाठलाग करत आले.व हातातील मोबाईल हिसकवून नेला.मोबाईलची किंमत 10 हजार रुपये आहे.शहर हद्दीत काल अशोक नगर पाणी टाकी परीसरातून हि याच पध्दतीने महिलेच्या हातातून चोरट्यांनी मोबाईल हिसकवून नेला.अत्ता पर्यत पाच ते सहा घटना घडल्या आहे.

मोबाईल चोरट्यांन विरुध्द शहर पोलीसांत वकिल सोनवणे यांनी लेखी तक्रार दिली आहे.
पुढील तपास पोलीस करत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/