धुळे : किटकनाशक फवारणी करताना शेतकऱ्याचा मृत्यू

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – पिकावर किटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊन नंदाळे गावातील शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. उपचारासाठी या शेतकऱ्याला चक्करबर्डी येथील हिरे मेडिकल काॅलेज मधील रुग्णालया दाखल करण्यात आले होते मात्र दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. लोटन छगन वाघ (रा. नंदाळे) असे विषबाधा होऊन मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी वाघ हे पिकावर किटकनाशक फवारणी करत होते. वाऱ्याच्या विरुध्द दिशेने फवारणी केल्याने औषध त्यांच्या चेहऱ्यावर आले. नाक आणि तोंडावाटे ते पोटात गेल्याने वाघ हे फवारणी करताना जमिनीवर कोसळले. त्यांनी जोरात आवाज दिला. बाजूलाच असलेल्या शेतातील मजुरांनी धावत येऊन ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असतानाच दुपारी दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. हि वार्ता नंदाळे गावात पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like