Navratri 2020 : चुकून देखील ‘या’ 13 मोठया चुका नका करू, अन्यथा नकारात्मक शक्ती घेऊन जाईल पुजेचं फळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –    शारदिय नवरात्र पर्वाची सुरुवात आजपासून सुरु होत आहे. या दिवसात बहुतेक लोक उपवास करतात. पण तुम्हाला माहिती आहे का की, या 9 दिवसाच्या आई दुर्गेच्या नवरात्री उपवासामध्ये संयम व शिस्तीची प्रार्थना करायची असते. त्यामुळे या नवरात्रीच्या वेळी तुम्हाला जर देवी देवीला संतुष्ट करायचे असेल तर ही 13 कामे टाळा.

चुकूनही करु नका या मोठ्या चुका…..कारण नवरात्रीमध्ये हे 13 कामे केली तर आई राणी नाराज होते

1. नवरात्रात अखंड दिवे जाळत असल्यास, या दिवसात घर रिकामे ठेवून बाहेर जाऊ नका.

2. नऊ दिवस नखे कापू नका.

3. उपवास करणाऱ्यांनी दाढी-मिशी आणि केस कापू नये.

4. खाण्यामध्ये कांदा, लसून आणि नॉनवेज खाऊ नये.

5. नऊ दिवस उपवास करणाऱ्यांनी खराब कपडे अथवा न धुतलेले कपडे घालू नये.

6. उपवास करणार्‍या लोकांनी बेल्ट, चप्पल, शूज, पिशव्या यासारख्या चामड्याच्या वस्तू वापरू नयेत.

7. उपवास असणाऱ्यांनी नऊ दिवस लिंबू कापू नये.

8. उपवासाच्या वेळी नऊ दिवस धान्य व मीठ खाऊ नये.

9. विष्णू पुराणानुसार नवरात्र उपवासात दिवसा झोपायला मनाई आहे.

10. फळ एकाच ठिकाणी बसून खा.

11. चालीसा, मंत्र किंवा सप्तशती वाचताना बोलताना मधूनच उठण्याची चूक करू नका अन्यथा नकारात्मक शक्ती घेऊन जाईल पूजेचे फळ.

12. शारीरिक संबंध ठेवल्याने उपवासाचे फळ मिळत नाही.

13. भूक मिटवण्यासाठी बरेच लोक तंबाखू खातात, उपवासाच्या वेळी ही चूक करू नका. व्यसनाने उपवासात खंड पडतो.