भाजपनं मुख्यमंत्र्यांवर ‘हल्लाबोल’ केल्यानंतर युवासेनेचा BJP नेत्याला ‘खोचक’ सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्तांतर झाले आणि भाजप शिवसेना हे एकत्र असलेले नात्यांची वेगळा संसार सुरु झाला. आता दोन्ही नेत्याकडून एकमेकांवर टीका करण्यात येते. नव्या मुख्यमंत्र्यांनी आरे आणि नाणार प्रकरणातील आंदोकांवरील गुन्हे मागे घेतले. त्यानंतर तात्काळ भाजप नेते मोहित भारतीय यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. परंतू आता युवासेनेचे कोअर कमिटीचे सदस्य जय सरपोतदार यांनी त्यांनी आपल्या भाषेत चोख प्रतिउत्तर दिले. जय सरपोतदार यांनी ट्वीट करत म्हणले की मोहित भारतीय यांना पर्यावरण प्रेमी आणि दहशतवादी यांच्यातील फरक माहित नसावा हे यावरुन स्पष्ट होते. तसेच त्यांनी ज्या संधीचा उल्लेख केला त्याचा फायदा तुम्हीच उचलला पाहिजे असा टोमणा देखील सरपोतदार यांनी भाजप नेते सरपोतदार यांना हाणला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे आंदोलक आणि नाणार आंदोलक यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यााचे आदेश प्रशासनाला दिले. तर भाजप नेते मोहित भारतीय यांनी यावर टीका करत म्हणले की आता लवकर महाराष्ट्र सरकार दाऊदवरील सर्व गुन्हे मागे घेऊन त्याला क्लीनचीट देणार.

याबाबत मोहित भारतीय म्हणाले की सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दाऊदवरील गुन्हे मागे घेऊन त्याला महाराष्ट्र सरकार लवकर क्लीनचीट देणार आहे. राज्यात गुन्हे मागे घेण्याचं सत्र सुरु आहे. त्वरा करा, काही दिवस शिल्लक आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे.

शिवाय महाराष्ट्रातील लोकशाहीची अशी अवस्था पाहावयाला मिळत आहे की विधानसभेत 288 उमेदवार निवडून येऊन सुद्धा त्यातील एकही मुख्यमंत्री होऊ शकला नाही असे सांगितल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली होती.

त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यावर सांगितले की आरे कॉलनीत जेवढी झाडे राहिली आहेत तेवढी तशीच राहतील. या झाडांपैकी एकही झाड कापले जाणार नाही त्या झाडाच्या पानाला देखील हात लावता येणार नाही. त्यांनी कारशेटच्या कामाला स्थगिती देखील दिली. शिवाय आरे विरोधात आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हा मागे घेण्याचे आदेश पोलिसांना दिले.

भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट केले होते की आरे आंदोलकांवरील केसेस मागे घेतली आता नाणार आंदोलनाच्या केसेस देखील परत घ्या. ते देखील पर्यावरण आणि आपल्या हक्कासाठी लढत होते. यानंतर उद्धव ठाकरे यांनी आदेश देत नाणार रिफायनरी विरोधात आंदोलन करणाऱ्या स्थानिकांच्या विरोधातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले.

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like