Dr Bhagawan Pawar Letter | पुण्यातील अधिकाऱ्याचा लेटर बॉम्ब, थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, मंत्र्याचा नियमबाह्य कामांसाठी दबाव, आरोग्यमंत्री पुन्हा अडचणीत!

पुणे : Dr Bhagawan Pawar Letter | राज्य सरकारच्या एका अधिकाऱ्याच्या लेटर बॉम्बमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. मंत्र्यावर गंभीर आरोप करणाऱ्या या पत्रामुळे राज्य सरकारच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अगोदरच बदनाम झालेला राज्य सरकारचा आरोग्य विभाग या लेटर बॉम्बमुळे पुन्हा चर्चेत आला आहे.

आता राज्य सरकार यावर कारवाई करणार की नेहमीप्रमाणे क्लिनचीट देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पुण्यातील या अधिकाऱ्याने आपल्यावर झालेल्या अन्यायाचा उल्लेख करत गंभीर प्रकारांचा खुलासा करणारे हे पत्र थेट मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.

पुणे येथील निलंबित आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना हे पत्र लिहिले असून पत्रात गंभीर आरोप केले आहेत. एका मंत्र्याने नियमबाह्य कामांसाठी दबाब आणल्याचे या पत्रात म्हटले आहे.

भगवान पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेले हे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar), राज्याचे मुख्य सचिव, अप्पर मुख्य सचिव यांना देखील दिले आहे.

अधिकारी भगवान पवार यांनी पत्रात म्हटले आहे की, मी मागासवर्गीय अधिकारी असल्यामुळे हेतुपुरस्सरपणे त्रास देण्याच्या हेतूने निलंबन करण्यात आले आहे. मंत्री महोदय यांनी मला पुणे स्थित कात्रज येथील कार्यालयात (Katraj Office) वारंवार बोलावून नियमबाह्य टेंडरची कामे, खरेदी प्रक्रियेची कामे व इतर कामामध्ये मदत करण्यासाठी दबाव आणला होता. परंतू मी नियम बाह्य कामात मदत केली नाही व इतर नियमबाह्य कामे केली नाहीत म्हणून माझे निलंबन करण्यात आलेले आहे.

पत्रात पुढे म्हटले आहे की, निलंबनासंदर्भात मी मॅटमध्ये दावा दाखल केला आहे.
परंतु माझी मानसिक छळवणूक सुरु केली होती आणि पुणे मनपात प्रमुख आरोग्य अधिकारी हे पद रिक्त करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले.
त्यासाठी जुन्या तक्रारीच्या अनुषंगाने २९/०४/२०२४ रोजी चौकशी समिती स्थापन करुन
चौकशी न करताच घाई गडबडीत मंत्र्यांना अपेक्षित अहवाल मिळवला.
त्यानंतर मला निलंबित करण्यात आलेले आहे. माझे निलंबन हे मंत्री महोदय यांच्या दबावामुळे केलेले आहे,
असा गंभीर आरोप पवार यांनी पत्रात केला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांचेही पत्र काही दिवसांपूर्वी खुपच गाजले होते.
त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ई-मेल पाठवला होता.
१०० कोटी रुपये वसुली करण्याचे आदेश तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिल्याचे म्हटले होते.
त्यानंतर राज्यात भूकंप आला होता. यानंतर महायुती सरकारने देशमुख यांना तुरूंगात सुद्धा पाठवले.
आता महायुती सरकार या पत्राची दखल सुद्धा अशाच प्रकारे घेते
की, नेहमी प्रमाणे आपला मंत्री म्हणून दुर्लक्ष करणार अथवा क्लिनचीट देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PCMC News | मंगळसूत्र विकून, सोने गहाण ठेऊन पूर रेषेतील बांधकामांसाठी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील अधिकाऱ्यांना पैसे दिल्याचा आरोप

Ravindra Dhangekar On Ajit Pawar | पोर्शे कार अपघातावरून धंगेकरांचा अजितदादांवर निशाणा,
”त्यांची भाषा सैल झालीय, फडणवीसांनी हातपाय बांधून खुर्चीत ठेवलंय” (Video)

Porsche Car Accident Pune | सुरेंद्रकुमार अग्रवालने ड्रायव्हरला खोलीत डांबले; ड्रायव्हरच्या बायकोने आरडाओरडा केल्यानंतर सुटका (Videos)