24 तासात देशात तिसऱ्यांदा भूकंपाचे धक्के ! गुजरात, मिझोरम, लडाखमध्ये हादरली जमीन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   रविवारी संध्याकाळी पूर्वोत्तर मिझोरम राज्यात भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.6 मोजली गेली. भूकंप चम्फाईपासून नैऋत्यमध्ये 25 किलोमीटर वर होता. मिझोरममध्ये भूकंप होण्याच्या काही काळाआधी गुजरातमधील कच्छ येथे 4.2 तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू भचाऊ जवळ होता. त्याच वेळी आज कारगिलमध्ये 4.7 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. गेल्या 2-3 आठवड्यांत मिझोरममध्ये बर्‍याच वेळा लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यापूर्वी शुक्रवारी दुपारी मिझोरमच्या चम्फाई जिल्ह्यातही 4.6 तीव्रतेचा भूकंप झाला. गेल्या 15 दिवसांत राज्यातील हा सहावा भूकंप होता, अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या माहितीनुसार दुपारी अडीचच्या सुमारास हा भूकंप झाला. त्याचे केंद्र चंपाईपासून 52 कि.मी. दक्षिण-आग्नेय दिशेने होते. त्याची खोली 25 किमी होती. चम्फाईचे उपायुक्त मारिया सीटी जुआली म्हणाले की, भूकंपामुळे झालेल्या नुकसानीचे अद्याप आकलन झाले नाही. कारण काही गावांपर्यंत पोहोचता आलेले नाही. ते म्हणाले की, जिल्हा प्रशासन बाधित गावांकडून माहिती गोळा करीत आहे. शनिवारी इतर अधिकाऱ्यांसह त्यांनी बाधित गावांचा दौरा केला. उल्लेखनीय आहे की 18 ते 24 जून दरम्यान राज्यातील चम्फाई, सैतुअल आणि सेरछिप जिल्ह्यात सलग भूकंप झाले.

दिल्ली-एनसीआरमध्येही भूकंप झाला

दिल्ली एनसीआरमध्ये देखील शुक्रवारी भूकंपाचे जवळपास याच तीव्रतेचे धक्के जाणवले. शुक्रवारी संध्याकाळी दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रासह उत्तर भारतात मध्यम स्वरूपाचा भूकंप 4.7 तीव्रतेसह जाणवला. भूकंपाचे केंद्रस्थान राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात होते. नॅशनल सिस्मॉलॉजी सेंटर (एनसीएस) च्या मते, सायंकाळी सात वाजता हा भूकंप झाला जो 35 किमीच्या खोलीवर केंद्रित होता. दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) मध्येही भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

गेल्या तीन महिन्यांपासून देशाच्या विविध भागात मध्यम किंवा कमी तीव्रतेचे भूकंप होत आहेत. आतापर्यंत हे भूकंप दिल्ली-एनसीआर, गुजरात, महाराष्ट्र, झारखंड, जम्मू काश्मीर, मिझोरम, ओडिशा, छत्तीसगड इत्यादी अनेक राज्यांत झाले आहेत आणि त्यामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे भूकंपामुळे अद्याप कोणत्याही मृत्यूची नोंद झालेली नाही. भूकंपामुळे गुजरात आणि मिझोरममधील लोकांच्या घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. एकापाठोपाठ एक येणाऱ्या या भूकंपांच्या धक्क्याने वैज्ञानिकांनाही आश्चर्यचकित केले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like