‘संभाव्य’ मंत्र्यांच्या यादीत राष्ट्रवादीच्या 10 तर काँग्रेसच्या 9 दिग्गजांची नावं, सुत्रांची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्तस्थापनेचा पेच सुटताना दिसत आहे त्याबरोबरच सत्तावाटपावर आता चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे या नव्या सरकारात कोणत्या पक्षाला कोणते मंत्रिमंडळ मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे मंत्रिमंडळातील नेत्यांची नावे घेऊन दाखल झाले आहेत. काँग्रेसने देखील आपली मंत्रिपदासाठीची नावे तयार केल्याची सुत्रांची माहिती आहे.

या मंत्रिमंडळात कोणत्या नेत्यांना कोणती मंत्रिपदे मिळणार याची संभाव्य नावे समोर येत आहेत. या संभाव्य मंत्रिमंडळात राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपल्या पक्षांतील दिग्गज आणि अनुभवी नेत्यांच्यावर धूर दिल्याचे बोलले जात आहे. आघाडीत अनेक नेते नव्या मंत्रिमंडळात दिसतील अशी शक्यता आहे.

ही आहेत काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांची नावे –

  • बाळासाहेब थोरात
  • अशोक चव्हाण
  • पृथ्वीराज चव्हाण
  • विजय वडेट्टीवार
  • यशोमती ठाकूर
  • के सी पाडवी
  • विश्वजीत कदम
  • सतेज बंटी पाटील
  • सुनिल केदार
  • या नेत्यांसह आणखी बऱ्याच नेत्यांबाबत काँग्रेसमध्ये चर्चा सुरु आहे.

 

  • ही आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्याची नावे –
  • अजित पवार
  • जयंत पाटील
  • नवाब मलिक
  • हसन मुश्रीफ
  • अनिल देशमुख
  • धनंजय मुंडे
  • छगन भुजबळ
  • राजेश टोपे
  • दिलीप वळसे पाटील
  • मकरंद पाटील

या नेत्यांसह आणखी काही नेत्यांना मंत्रिपदांची संधी राष्ट्रवादीकडून मिळू शकते. राष्ट्रवादी सह काँग्रेसचे देखील मंत्रिमंडळात 15 मंत्री असू शकतात त्यामुळे आणखी काही नेत्यांच्या नावावर चर्चा आहे.

मुख्यमंत्रिपद दोघात की शिवसेनेत –

राज्यात निकाल लागले तेव्हा चित्र उघड झाले की कोणत्याही पक्षाल बहुमताचा आकडा गाठता आला नाही. त्यामुळे महाशिवआघाडीची गणितं आता जुळताना दिसत असली तरी हे स्पष्ट आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या जागांमध्ये फारसा फरक नाही. त्यामुळे राष्ट्रवादीकडून अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदासाठी मागणी होऊ शकते. 50 – 50 च्या फॉर्म्युल्यावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की मुख्यमंत्रिपदाची पहिली टर्म शिवसेनेला मिळेल अशी चर्चा बैठकीत झाली आहे. त्यामुळे ही शक्यता बळावली आहे की दुसऱ्या टर्ममध्ये मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे जाईल.

Visit : Policenama.com