शेतकर्‍यांना मिळणार बंपर लाभ ! खरीप पिकांच्या MSP वर सरकार करतेय जोरदार खरेदी

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –    नवीन कृषी कायद्यांबाबत पंजाबसह देशातील अनेक राज्यांत निदर्शने होत आहेत. विरोधी पक्ष कॉंग्रेससह अनेक राजकीय पक्ष या कायद्यांचा विरोध करत आहेत. काही शेतकरी व राजकीय पक्ष असा तर्क देत आहेत की, पिकांना किमान आधारभूत किंमत (एमएसपी) प्रणाली धोक्यात येईल. तर दुसरीकडे भाजप हे शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचे सांगत आहे. नवीन कृषी कायद्याच्या निषेधा दरम्यान एमएसपीवर खरीप पिकांची जबरदस्त खरेदी झाली आहे. खरीप मार्केटिंग सीजन 2020-21 मध्ये 151.17 लाख मेट्रिक टन धान्य खरेदी करण्यात आले आहे.

पंजाबमधून खरेदी केले गेले सर्वाधिक धान्य

नवीन कृषी कायद्याचा सर्वाधिक विरोध करणाऱ्या पंजाबमध्ये 25 ऑक्टोबरपर्यंत 100.89 लाख मे.टन धान्य खरेदी करण्यात आले आहे. त्याचबरोबर देशभरात आतापर्यंत 151.17 लाख मे.टन धान्य एमएसपीवर खरेदी करण्यात आले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण 20.89 टक्के जास्त आहे. मागील वर्षी 125.05 लाख मे.टन धान्य खरेदी करण्यात आले होते. अर्थात एकट्या पंजाबमधील शेतकऱ्यांकडून 66.71 टक्के धान खरेदी करण्यात आले आहे. पंजाब व्यतिरिक्त हरियाणा, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, उत्तराखंड, चंदीगड, गुजरात आणि केरळमधील शेतकऱ्यांकडून एमएसपीवर धान्य खरेदी केले गेले. धान्य खरेदीसाठी 12,98,845 शेतकऱ्यांना 28,542.59 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

MSP वर या पिकांची देखील केली जातेय खरेदी

राज्यांकडून आलेल्या प्रस्तावानुसार तमिळनाडु, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश, ओडिशा, राजस्थान आणि आंध्र प्रदेशकडून प्राइस स्पोर्ट स्कीम अंर्तगत 45.10 लाख मे. टन डाळ आणि ऑइल शीटची खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली. त्याशिवाय आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमधूनही 1.23 लाख मे.टन नारळ खरेदीस मान्यता देण्यात आली आहे. राज्यांकडील प्रस्तावांनंतर अधिक डाळी, ऑइल शीट खरेदी केली जाईल. तामिळनाडू, महाराष्ट्र आणि हरियाणा येथील शेतकऱ्यांकडून 7.09 कोटी रुपये किंमतीची 986.39 मेट्रिक टन मूग आणि उडीद डाळ खरेदीचा फायदा 923 शेतकऱ्यांना झाला आहे. त्याशिवाय कर्नाटक आणि तामिळनाडूमधील 3961 शेतकर्‍यांकडून 52.40 कोटी रुपयांचे 5089 नारळ खरेदी केले गेले आहेत.

या राज्यांमधून कापूस खरेदी सुरू आहे.

एमएसपी प्रणालीअंतर्गत पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि मध्य प्रदेशातून कापूस खरेदी केली जात आहे. ताज्या आकडेवारीनुसार 25 ऑक्टोबर 2020 पर्यंत 68,419 शेतकर्‍यांकडून 1,04,790.17 लाख रुपये किंमतीच्या 3,53,252 गाठी कापूस खरेदी करण्यात आला आहे.