Instagram वर झाली त्यांची ‘फ्रेन्डशीप’, वाढदिवस साजरा करण्यासाठी बोलावून 16 वर्षीय मुलीवर गँगरेप, मुंबईतील धक्कादायक घटना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या एका 16 वर्षीय तरुणीवर तिच्याच 7 मित्रांनी सामुहिक बलात्कार (gangrape) केल्याची धक्कादायक घटना मुंबईतून समोर आली आहे. मुंबईतील मालवणी भागात सोमवारी (दि. 31) रात्री ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली असून 7 व्या आरोपीचा शोध सुरू आहे.

पीडित मुलीच्या तक्रारीवरून सामूहिक बलात्कार gangrape आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा आरोपींविरोधात दाखल केला आहे. आरोपींपैकी एक तिचा इन्स्टाग्रामचा मित्र होता. तर बाकी तिच्या मित्राचे मित्र होते. सर्व आरोपींचे वय 18 ते 23 वयोगटातील आहेत.

मालवणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरूणीचे इन्स्टाग्रामवर अनेक मित्र होते. यापैकी मालवणी येथे राहणाऱ्या मित्राचा वाढदिवस होता. त्याने पिडित तरुणीला वाढदिवसाच्या पार्टीसाठी बोलावले होते. आई वडिलांपासून लपून तरूणी पार्टीला गेली होती. घरातून जाताना तिने घराचा दरवाजा बाहेरून बंद केला होता. ज्यावेळी मुलगी रात्री घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबाने ती बेपत्ता झाल्याची तक्रार मालवणी पोलीसात दिली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पीडित युवती घरी आली. त्यावेळी ती पोटात खूप दुखत असल्याचे आईला सांगितले. घरच्यांनी तिला पोटात दुखण्याचे कारण विचारले असता तिने उडवाउडवीची उत्तर दिली. त्यानंतर पोलिसांनी घरी येऊन चौकशी केली असता तिने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. मित्रांनी माझ्यावर गँगरेप gangrape केल्याचे तरुणीने सांगितले. एकदा नव्हे तर दोनदा तिच्यावर बलात्कार झाल्याचे पीडितेने पोलिसांनी सांगितले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Also Read This : 

Pune News : तळेगाव ढमढेरे येथे दिवसाढवळ्या खून, प्रचंड खळबळ

घरबसल्या ‘ओम’च्या जापाबरोबरच करा हा व्यायाम, फुफ्फुसांमध्ये येईल मजबुती; जाणून घ्या

भाजप कार्यालयाजवळ 51 क्रुड बॉम्ब आढळल्याने खळबळ !

केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात, तर कोरोना संक्रमणापासून दूर रहा; जाणून घ्या कारण?

प्रियकराने सैन्यात भरती होताच दिला धोका, लग्नाला नकार देताच तरुणीने काढली ‘वरात’

Video : ‘त्या’ निर्दयी आईला ‘मनसे’च्या महिलांनी शिकवला धडा

Video : छत्रपती संभाजीराजेंचा रायगडावरून इशारा, म्हणाले – ‘मी मेलो तरी चालेल पण, समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही’

‘या’ परिस्थितीत PF देणार 1 लाख रुपयांचा अ‍ॅडव्हान्स; जाणून घ्या