मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंकजा मुंडेंना दिलं ‘हे’ आश्वासन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री झाल्यानंतर माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी टि्वट करून उद्धव यांचं अभिनंदन केलं. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘आपले मनःपूर्वक धन्यवाद पंकजा ताई मुंडे! ‘राज्याचे हित प्रथम’ याच संस्कृतीने आणि परंपरेने महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी काम करेल आणि स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल असा विश्वास मी तुम्हाला देतो ,’ असं म्हणत आभार मानले.

एका ठाकरेंनी पहिल्यांदा निवडणूक लढविली आणि एक मुख्यमंत्री झाले. हार्दिक अभिनंदन!! महाराष्ट्रातील संस्कृती व परंपरा हीच आहे, ‘राज्याचे हित प्रथम ‘!! राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांना राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन करणारं ट्विट 28 तारखेला शपथविधीनंतर केलं होतं. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रिप्लाय दिला.

पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर?-

पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून पुढे काय करायचं? 12 डिसेंबरला ठरवू असे म्हंटले आहे. तसेच पंकजा मुंडे यांनी ट्विटर बायोही बदलला आहे. गेल्या काही दिवसांत पंकजा यांनी शिवसेनेचे कौतूक करणारे ट्विट केले आहेत. या सर्व घडामोडींमुळे पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार का? अशी अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.