साथीदारासमोरच ‘तो’ करायचा महिलांवर बलात्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोरट्यांना घरात मौल्यवान वस्तू न सापडल्याने ते घरच्यांसमोर महिलेवर बलात्कार केला, अशा एका चोरट्यांच्या टोळीचा पोलिसांनी बंदोबस्त केला आहे. गुजरातमधील विरगमन येथील वासावा गावामधून अहमदाबाद पोलिसांनी एका गुंडाला बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे. डाफर गँग नावाने स्थानिकांमध्ये दहशत असलेल्या गुंडाच्या गटातील अकबर उर्फ लूलो सिंधी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

अकबर वर दोन बलात्कारांच्या गुन्ह्यांचा आरोप आहे. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त राजदीपसिंह झाला यांनी या गँगमधील इतर तीन गुंडाचा शोध सध्या सुरु असल्याची माहिती दिली. अकबराने एका मुलीचा तिच्या प्रिंयकरासमोर तर एका महिलेचा तिच्या पतीसमोर बलात्कार केला होता. डाफर गँगवर चोरी, लुटमारी आणि खून अठरा गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

अकबराने केलेले दोन गुन्हे
नर्मदा कालव्याजवळून जाणाऱ्या एका प्रेमी युगलाला अकबर आणि त्याच्या साथीदारांनी चाकूचा धाक दाखवून अडवले मात्र त्यांच्याकडे मौल्यवान वस्तू न मिळाल्यामुळे अकबराने मुलीच्या प्रिंयकाराला ओढणीने बांधले आणि मुलीला झाडीत नेहून तिच्यावर सामोहिक बलात्कार केला. त्यानंतर मुलाचे हेल्मेट घेऊन सर्वजण पसार झाले. दहा ऑक्टोबर रोजी ही घटना घडली होती.

आचरसा गावामधील आपल्या शेतात एक दाम्पत्य झोपलेले होते. मध्यरात्री साडेतीन वाजता अकबर आणि त्याचे सहकारी त्या ठिकाणी पोहचले. धार धार शस्त्रांनी त्यांनी तेथील लोकांना धाक धाकवला आणि त्यांच्याकडे दागिन्यांची मागणी केली. मात्र आमच्याकडे काहीच नसल्याचे सांगताच अकबराने तीस वर्षीय महिलेवर तिच्या नवऱ्यादेखत बलात्कार केला होता.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like