‘नताशा-हार्दिक’ पांड्याला पुत्ररत्न ! शेअर केला फोटो

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्या आणि बॉलिवू़डमध्ये आपल्या हॉटनेसमुळं धुमाकूळ घालणारी त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री नताशा स्टानकोविक यांना पुत्ररत्न झालं आहे. हार्दिक आणि नताशा आई वडिल झाले आहेत. खुद्द हार्दिकनं ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

हार्दिकनं त्याच्या ट्विटरवरून बाळाच्या हाताचा फोटो शेअर केला आहे. हार्दिकनं लिहिलं की, आम्हाला मुलगा झाला आहे.” फोटोत दिसत आहे की, त्यानं आपल्या गोंडस बाळाचा हात हातात घेतला आहे.

हार्दिकनं शेअर केलेला हा बाळाचा क्युट फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक चाहत्यांनी हार्दिकला शुभेच्छा देत त्याच्या ट्विटवर कमेंट केली आहे. अनेकांना हार्दिक बाबा झाल्याचं पाहून आनंद झाला आहे. अनेकांनी त्याचं हे ट्विट शेअर केलं आहे. काहींनी लाईक करत हे ट्विट रिट्विटही केलं आहे.

काही दिवसांपूर्वीच हार्दिकनं ती प्रेग्नंट असल्याची गोड बातमीही चाहत्यांसोबत शेअर केली होती. दोघांनी गुपचूप लग्न केल्याचंही बोललं जात आहे. यानंतर दोघं सतत चर्चेत आहेत. असं असलं तर लग्नाबद्दल कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like