पाकचा ‘ISIS’शी असलेल्या संबंधाचा ‘ठोस’ पूरावा, अफगाणिस्तानच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेवाराचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताच्या शेजारील देश असलेल्या अफगाणिस्तानमध्ये 28 सप्टेंबरला राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. या दरम्यान अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती पदाचे उम्मेदवार अमरुल्लाह सलेह यांनी दहशतवादी संघटना आयएसआयएसचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा दावा केला आहे. सलेह म्हणाले की अफगाणिस्तानकडे या संबंधित ठोस पुरावे आहेत का पाकिस्तान दहशतवादी संघटनांना फंडिंग करते.

पाककडून दहशतवादाला फंडिंग
अफगाणिस्तानमधील अंतर्गत प्रकरणाचे मंत्री आणि गुप्तचर यंत्रणेचे माजी प्रमुख अमरुल्लाह सलेह यांनी दावा केला ही, काबुलमध्ये सुरक्षा दलाने नुकतेच एका आयएसआय समर्थकाला ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीनंतर त्यांनी सांगितले की पाकिस्तान त्यांना फंडिंग देते. पाकिस्तान दहशत निर्माण करण्यासाठी त्यांना शस्त्रास्त्रे पुरवतात. आमच्याकडे याचे ठोस पुरावे आहेत. सलेह म्हणाले की जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर भारतावर खार खाऊन असलेला पाकिस्तान अफगाणिस्तानवर सूड उगारत आहे असा आरोप त्यांनी केला, यामागे कारण आहे की अफगाणिस्तान भारताला मित्र मानतो.

काश्मीर भारताचा अंतर्गत प्रश्न
जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर सलेह यांनी या प्रकरणी आपले मत स्पष्ट केले. ते म्हणाले की, आमच्या मते भारत एक देश आहे आणि जम्मू काश्मीर त्याचा भाग आहे. अशात तेथील कलम 370 रद्द करणे हा त्यांचा अंतर्गत निर्णय आहे. आम्हाला वाटत नाही की हा मु्द्दा पाकिस्तान का उचलून धरत आहे आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणे देखील योग्य नाही.

तालिबान अफगाणिस्तानच्या सक्रिय राजकारणाचा हिस्सा होऊ शकतो का असे विचारल्यावर त्यांनी उत्तर दिले की, पाकिस्तानने बऱ्याच आधी मुख्यधारेच्या राजकारणात येण्याची ऑफर त्यांना दिली होती, परंतू त्यांनी त्याला नकार दिला आणि दहशतवादाचा रस्ता सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. असे यामुळे की तालिबानला माहिती आहे की दहशतवादी निवडणूक लढू शकत नाही आणि कोणतेही जागा जिंकू शकता नाही. त्यामुळे तालिबान सक्रिया राजकारणात येणे अवघड आहे.

ते म्हणाले की, पाकिस्तान जम्मू काश्मीरचा मुद्दा अफगाणिस्तानशी जोडत आहे. त्याला आमचा विरोध आहे. भारताला घाबरलेला पाक अफगाणिस्तानचा बदला घेत आहे. हे अमानवीय आहे, यालाच दहशतवाद म्हणतात. भारताच्या अंतर्गत राजकारणाचा प्रश्न आहे, तर मोदी सरकारवर हे निर्भर आहे की ते काश्मीरसंबंधित काय भूमिका घेतात.

मोदी अफगाणिस्तानचे मित्र
त्यांनी भारताच्या पंतप्रधान मोदींची स्तूती देखील केली सलेह म्हणाले की, अफगाणिस्तान पंतप्रधान मोदींना ना की फक्त चांगला मित्र मागत तर दहशतवादाविरोधात उचललेल्या ठोस भूमिकेचे समर्थन करतो.

सलेह म्हणाले की, जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द करुन मोदी सरकारने ठोस भूमिका घेतली आहे. अफगाणिस्तान त्यांना चांगला मित्र मानतो. आमचा हाच संदेश आहे की मोदी अफगाणिस्तानशी अधिक जोडले जावेत. भारत अफगाणिस्तानमधील मैत्री अजून मजबूत व्हावी. मोदी अफगाणिस्तान आणि भारत यांमधील एक मजबूत स्तंभ आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

तुळशीची पाने किडनी स्टोनवर गुणकारी, जाणून घ्या असेच ९ फायदे

शरीराला थंडावा देतात ‘हे’ पदार्थ, अवश्य करा यांचे सेवन, जाणून घ्या

देशातील युवा वर्ग होत आहे ह्रदयविकाराने त्रस्त, अशी घ्या काळजी

नैसर्गिक सौंदर्यासाठी ‘हे’ फेसपॅक वापरा, निस्तेज, कोरडा चेहरा होईल तजेलदार

काकडी खाल्ल्याने होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे, तुम्हाला माहीत नसावेत

कोणत्या फळात किती पाणी, जाणून घ्‍या ; वजन कमी करण्यासही फायदेशीर

२ रुपयांच्‍या तुरटीने संधीवात होतो दूर, जाणून घ्‍या इतरही अमेझिंग फायदे 

‘ही’ ५ फळे वेगाने करतात ‘फॅट बर्न’, आजच करा ‘डाएट’मध्‍ये समावेश

रोज चिमुटभर मिरपुड खाल्ल्याने कमी होईल वजन, होतील ‘हे’ फायदे

‘या’ ७ लोकांनी अवश्‍य प्‍यावा ‘पायनॅप्‍पल ज्‍यूस’, जाणून घ्‍या काय आहे कारण  

लग्नापूर्वी वर-वधूला का लावली जाते हळद ? जाणून घ्या

मानवाने प्राण्यांकडून शिकाव्यात अशा ‘या’ गोष्टी, राहाल नेहमी निरोगी, सशक्त

धान ! ‘या’ व्हिटॅमिनच्‍या कमतरतेमुळे होऊ शकतो मृत्‍यू, जाणून घ्या १२ संकेत