बेदाणे खाण्याचे ‘हे’ आहेत 5 फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   भारतासह जगभरातील लोक कोरोनाशी झुंज देत आहेत. हिवाळ्यात सतर्क राहण्याची गरज आहे. रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आहारात बेदाण्याचा वापर केला पाहिजे. आजारापासून मुक्त होण्यासाठी आणि वजन कमी करण्यास बेदाणे मदत करू शकतात. चला बेदाणे खाण्याच्या पाच फायद्यांविषयी जाणून घेऊया …

रात्री बेदाणे असे खावेत

रात्री कोमट दुधात 4-5 बेदाणे टाकून पिण्यामुळे सर्दी-थंडीपासून आराम मिळतो, असे आरोग्यतज्ञांचे म्हणणे आहे. सतत सेवन केल्यास टायफाइड सारख्या आजारांपासूनही मुक्तता मिळते.

वजन कमी होते

वजन कमी करण्याचे गुणधर्म बेदाण्यामध्ये आढळतात. शरीरातील चरबी पेशी तोडून वजन कमी करण्यात ते प्रभावी आहे. त्यामध्ये असलेल्या ग्लूकोजमुळे शरीरावराला अधिक ऊर्जा मिळते.

ताणापासून मुक्ती

बेदाणे खाल्ल्याने मानसिक ताणतणाव कमी होतो. त्यात आर्जिनिन नावाचे एक एमिनो असिड असते. जे तणावाची पातळी हळूहळू कमी करण्यात मदत करते. सकाळी बेदाणे खाल्याने अधिक फायदे मिळतात.

बद्धकोष्ठता दूर होते

बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त असल्यास बेदाणे खाणे फायदेशीर ठरू शकते. त्याच्या सेवनाने पोटाशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी होतो. पोटाची समस्या असलेल्यानी बेदाण्याचे सेवन करावे.

You might also like