Health Department Exam Paper Leak Case | आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरणात बीडमधील शिक्षकाला पुणे पोलिसांकडून अटक

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – Health Department Exam Paper Leak Case | आरोग्य विभागाच्या गट ‘क’ पेपरफुटी (Health Department Exam Paper Leak Case) प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) बीड मध्ये (Beed) कारवाई करुन एका जिल्हा परिषद शिक्षकाला अटक (Zilla Parishad Teacher Arrest) केली आहे. नागरगोजे (Nagargoje) असे या शिक्षकाचे नाव असून मागील 15 दिवसांपासून पुणे पोलीस (Pune Police) त्याचा शोध घेत होता. पोलीस मागावर असल्याचे समजल्यानंतर त्याने पथक शाळेत येण्यापूर्वीच गुंगारा देऊन फरार झाला होता. मात्र बुधवारी (दि.5) पथकाला त्याचा ठावठिकाणा समजला आणि त्याच्या मुसक्या आवळल्याचे सूत्रांनी सांगितले.

आरोग्य विभागाच्या गट ‘क’ पेपरफुटी (Health Department Exam Paper Leak Case) प्रकरणात नागरगोजे याला अटक केली आहे. आरोग्य विभागाच्या प्रश्नपत्रिका फोडण्यात त्याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोग्य विभागाच्या पेपरफुटी तसेच म्हाडा (MHADA Exam) आणि टीईटी (TET Exam) पेपरफुटी प्रकरणात आत्तापर्यंत 35 जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींचा पेपरफुटी प्रकरणात संबंध असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी सांगितले की, पेपर कोणताही असू द्या यामध्ये दलालांची एक साखळी असून जे लोक प्रश्नपत्रिका (Question Paper) तयार करतात त्यांच्या जवळील आहेत. हे सर्व दलाल विद्यार्थ्यांना एकत्रित करुन आणि परीक्षेच्या एक दिवसआधी परीक्षार्थींना सर्व प्रश्न पाठ करुन द्यायचे असे या दलालांचे काम होते असे त्यांनी सांगितले.

यापूर्वी पेपरफुटी प्रकरणात बीडच्या शिरूर तालुक्यातील तिंतरवणी येथील शिक्षक उद्धव प्रल्हाद नागरगोजे (Uddhav Pralhad Nagargoje) याला अटक करण्याात आली होती. याच उद्धव नागरगोजेचा आणि काल अटक करण्यात आलेल्या जिल्हा परिषद शिक्षक नागरगोजेचा जवळचा संबंध असल्याचे बोलले जातंय. तसेच वडझरी पॅटर्नच्या (Wadzari pattern) संजय सानप (Sanjay Sanap) याला ज्या मार्गाने गट ‘क’ची प्रश्नपत्रिका मिळाली तशीच नागरगोजेला मिळाल्याची चर्चा आहे.

बीड मधील नगर रोडवरील एका मंगल कार्यालयात ज्याप्रमाणे संजय सानपचे उमेदवार थांबले होते.
तसेच काल अटक करण्यात आलेल्या नागरगोजेचे उमेदवार नगर रोडवरील एका मंगल कार्यालयात थांबले असल्याचं सांगितले जात आहे. तसेच या जिल्हा परिषद शिक्षक नागरगोजेचा संबंध अनेक भरती प्रकरणाशी असल्याची चर्चा आहे.
तर अटकेत असलेला आरोपी सुखदेव डेरे (Sukhdev Dere) आणि नागरगोजे एकमेकांचे खास असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title : Health Department Exam Paper Leak Case | maharashtra government
health department exam paper leak case beed zp teacher arrested by pune police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवून केले 9 महिन्यांची गर्भवती;
कोंढव्यातील घटना

Pune Crime | कलयुग ! पोटच्या मुलानं केला आई-बापावर खुनी हल्ला, आई जागीच ठार;
इंदापूर तालुक्यातील घटना

TET Exam  Scam | टीईटी पेपर फुटी प्रकरणात नवा खुलासा, आरोपी अश्विनकुमारने 700 विद्यार्थ्यांचे बदलले मार्क, G.A. Software चा संस्थापक गणेशन याचाही सहभाग उघड

LIC Kanyadan Policy | दररोज वाचवा 130 रुपये, 25 वर्षानंतर मिळतील 27 लाख,
जाणून घ्या काय आहे प्लान

 फायनान्स कंपनीच्या लोकांकडून महिलेचा विनयभंग, ओढून नेली रिक्षा

 लग्नाचे आमिष दाखवून आईबरोबर शारिरीक संबंध, मुलीशी लग्न लावून देण्यासाठी दिली धमकी