महिला एकदा प्रेग्नंट असतानाही दुसर्‍यांदा प्रेग्नंट होऊ शकते का ? कमी असतात सुपरफिटेशनची प्रकरणे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   एखादी महिला एकदा प्रेग्नंट असताना सुद्धा दुसर्‍यांदा प्रेग्नंट होऊ शकते का? ऐकायला हे अजब वाटत असले तरी असे होऊ शकते. दोनदा प्रेग्नंट होण्याच्या या आवस्थेला सुपरफिटेशन म्हणतात. मात्र, सुपरफिटेशनची प्रकरणे खुपच कमी आढळतात. परंतु, त्यांची शक्यता नाकारता येत नाही.

सुपरफिटेशन तेव्हा होते जेव्हा प्रेग्नंसी सुरू असताना दुसरी प्रेग्नंसी होते. यामध्ये प्रेग्नंसी सुरू झाल्यानंतर काही दिवसात किंवा आठवड्यानंतर प्रेग्नंट महिलेचे एग्ज स्पर्मच्या संपर्कात येऊन फर्टिलाइज होतात, ज्यामुळे नवी प्रेग्नंसी सुरू होते. सुपरफिटेशनने जन्माला आलेल्या मुलांना नेहमी जुळे म्हटले जाते. कारण ते एकाच वेळी किंवा एका दिवसात जन्माला येतात.

सुपरफिटेशन जास्तकरून मासे, ससा यासारख्या जनावरांमध्ये जास्त होते. महिलांमध्ये याची शक्यता खुप कमी असते. सुपरफिटेशनची बहुतांश प्रकरणे आयव्हीएफ ट्रीटमेंट घेण्यार्‍या महिलांमध्ये होतात. स्पर्मने फर्टिलाइज्ड एग्जद्वारे प्रेग्नंसी होते. सुपरफिटेशनमध्ये एक दुसरे एग फर्टिलाइज होऊन गर्भात वेगळे प्रत्यारोपित होते.

सुपरफिटेशन तेव्हा होते, जेव्हा प्रेग्नंसीदरम्यान महिलेचे ओवुलेशन होते. मात्र, ही शक्यता नसते, कारण प्रेग्नंसीदरम्यान, निघणारे हार्मोन्स पुढील ओवुलेशन रोखतात. यासाठीच सामान्यपणे अशी प्रकरणे समोर येत नाही. एकदा प्रेग्नंसी झाल्यानंतर गर्भाशयात दुसर्‍या भ्रूणासाठी आवश्यक जागा नसते, यासाठी सुद्धा सुपरफिटेशन सहज शक्य नाही.

फर्टिलिटी ट्रीटमेंटच्या दरम्यान फर्टिलाइज्ड भ्रूणाला महिलेच्या गर्भाशयात स्थानांतरित केले जाते. जर एखादी महिला या प्रक्रियेच्या काही आठवड्यानंतर सुद्धा ओवुलेट झाली आणि तिचे एग्ज फर्टिलाइज्ड झाले तर सुपरफिटेशनची स्थिती होते.

सुपरफिटेशनची लक्षणे

सुपरफिटेशनची प्रकरणे खुप कमी असतात, यासाठी त्याची काही खास लक्षणे आढळत नाहीत. या स्थितीत चेकअपदरम्यान डॉक्टरांना समजते की, गर्भात जुळ्या भ्रूणांचा विकास वेगवेगळ्या वेळेपासून होत आहे. अल्ट्रासाउंडच्या दरम्यान, दोन्ही भ्रूणांची स्थिती स्पष्ट प्रमाणे दिसते.

सुपरफिटेशनमध्ये अडचण

सुपरफिटेशनची सर्वात मोठी अडचण ही असते की, प्रेग्नसीच्या दरम्यान मुलांचा विकास वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये होतो. जसे की एका मुलाची डिलिव्हरीची वेळ आली असेल, तर दुसरे भ्रूण या वेळेपर्यंत योग्य प्रकारे तयार झालेले नसेल. यात दुसरे बाळ प्रीमॅच्युर जन्माला येण्याची शक्यता जास्त असते.

प्रीमॅच्युर जन्माला येणार्‍या बाळांना श्वासाची अडचण, वजन कमी असणे, फिड करण्यात अडचण, इतकेच नव्हे तर ब्रेन हॅमरेज सारखी समस्या सुद्धा होऊ शकते. सुपरफिटेशनमध्ये प्रेग्नंट महिलेला सुद्धा हाय ब्लड प्रेशर आणि डायबिटीज सारखी समस्या होऊ शकते. या स्थितीपासून वाचण्यासाठी प्रेग्नंसीच्या नंतर सेक्स टाळावा.

You might also like