‘वजन’ कमी करण्यापासून फुफ्फुसे ‘निरोगी’ ठेवण्यापर्यंत, ‘बीट’चे ‘हे’ आहेत 8 फायदे !, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   प्रत्येक भाजीचे स्वत:चे असे काही गुण आणि फायदे असतात. यासाठी म्हटले जाते की, प्रत्येक भाजी नियमित सेवन केली पाहिजे, जेणेकरून शरीराच्या प्रत्येक भागाला त्याचा फायदा मिळावा. अशाच एका भाजीबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. तसेच या भाजीचे फायदे कोणते आहेत, याची महिती घेणार आहोत. ही भाजी आहे बीट. यामध्ये मोठ्याप्रमाणात व्हिटॅमिन-ए, सी च्याशिवाय अँटीऑक्सीडेंट आणि बिटा कॅरेटिन असते. हे नियमित सेवन केल्यास अनेक फायदे होतात.

हे आहेत फायदे

1. यातील फायटोकेमिकल्स आणि अँटीऑक्सीडेंट तुमच्या शरीरात कँसरचा धोका कमी करतात. यातील कोसाइनोलेट्समुळे कँसरचा प्रभाव कमी होतो.

2. बीटमध्ये मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन असते. यामुळे ब्लडप्रेशन नॉर्मल राहते.

3. फुफ्फुसातील सूज आणि कफची समस्या दूर करते आणि त्याची स्वच्छता करते.

4. यमाध्ये भरपूर अँटी-इम्फ्लेमेटरी गुण असल्याने हार्ट अटॅक, हार्ट स्ट्रोक आणि हृदयाशी संबंधित आजरा रोखण्यास मदत करते.

5. यातील फायबरमुळे पचनक्रिया सुधारते. पोटाचे आजार दूर होतात. बद्धकोष्ठता असल्यास नियमित बिट खावे.

6. यामध्ये कॅलरीची मात्रा खुप कमी असल्याने वजन कमी करण्यास उपयुक्त आहे.

7. यातील मुबलक आयर्नमुळे रक्ताची कमतरता दूर होते. अ‍ॅनिमियावर बीट गुणकारी आहे.

8. बीट सेवन केल्याने कोणत्याही प्रकारची सूज कमी होण्यास मदत होते.