पुणेकरांनो सावधान ! आगामी 48 तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यामध्ये अति प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे पुणेकर खूपच त्रस्त झाले आहे. यामुळे त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे लोकांना बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. आणखी दोन दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पुणे शहरामध्ये येत्या दोन दिवसामध्ये विजांच्या कडकडासह मुळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यप यांनी दिली आहे. त्याचबरोबर २ नोहेंबरनंतर पाऊस थांबेल असे देखील त्यांनी सांगितले आहे.

जोरदार पाऊस पडल्यामुळे शहरांसह अनेक जिल्ह्यांना पावसाने चांगलेच झोडपले आहे. या पावसामुळे शेतकऱ्याचे खूप नुकसान देखील झाले. बुधवारी शिरूर, जुन्नर, आंबेगाव अशा अनेक तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. अति पावसामुळे जुन्नरमधील ओतूर रोहोकडी येथे पूर आला आहे. या पुरामुळे शेतीचे खूप नुकसान झाले.

ग्लोबल वॉर्मिंग आणि उशीराने झालेल्या मान्सूनच्या आगमनाच्या परिणामामुळे नोहेंबर महिन्यातही पावसाच्या सरी कोसळू शकतात असा देखील अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शनिवारी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे. लक्षद्वीप आणि लगतच्या दक्षिण-पुर्व अरबी समुद्रावर ‘महा’ हे चक्रिवादळ तयार झाले आहे. पश्चिम-मध्य अरबी समुद्रावर ‘कयार’ हे चक्रीवादळ अजूनही आहे. याच्या प्रभावामुळे शुक्रवारी राज्यात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Visit : Policenama.com