बापाचे छत्र हरवलेल्या पोराला तिकीट देऊन पाडताना लाज कशी वाटली नाही : राजाराम तांबे

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – वयाच्या 22 व्या वर्षी ज्याच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरवले त्या मुलाला आपली सर्व स्वप्ने बाजूला ठेऊन अचानक आलेल्या संकटाला तोंड देत वडिलांचा वारसा सांभाळण्याची मोठी जबाबदारी खांद्यावर येऊन पडली. वय कमी असतानाही त्या पोराने संपूर्ण तालुक्यात पक्ष संघटना वाढवण्यासाठी जीवाचे रान केले आणि त्याच पक्षाने 2009 साली राहुल कुल यांना तिकीट देऊन पाठीत खंजीर खुपसून त्यांना पाडताना यांना लाज कशी वाटली नाही असा घणाघाती हल्ला भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजाराम तांबे यांनी करत या पक्षाने कधीच खऱ्या कार्यकर्त्यांना ताकद दिली नाही फक्त त्यांचे राजकीय खच्चीकरण करायचेच काम केले त्यामुळे आज या पक्षाची अशी अवस्था झाल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसची बगलबच्ची आमदार राहुल कुल यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टिका करतात. वाट्टेल ते बोलतात पण कुल यांच्यावर चांगल्या घराचे संस्कार झाले असल्याने ते अशा टिकेकडे दुर्लक्ष करतात. ज्या लोकांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर तालुक्यामध्ये अराजक माजले होते. संपूर्ण तालुका हा खून-खराबा आणि भाईगिरीच्या मुखात लोटला गेला होता तो कुणाच्या काळात होता हेही जनता विसरली नाही. त्यामुळे राहुल कुल हे दबाव आणतात, दमबाजी करतात हे बोलणारे महाभाग फक्त खोटे बोलून कुल यांना बदनाम करायचे पाहत असून खरे दादागिरी करणारे कोण आहेत हे तालुक्याने यांच्या प्रचार सभांमध्येच पाहिले असल्याचे त्यांनी सांगितले. जनता ही कुरघोड्या करणाऱ्या लोकांना त्यांची जागा दाखवून कुल यांना मोठ्या फरकाने निवडून देईल असा विश्वास शेवटी त्यांनी व्यक्त केला.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या