‘तेजस्वी यादव बिहारचे मुख्यमंत्री झाले तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –   तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) बिहारचे मुख्यमंत्री झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही. शेवटी जनभावना महत्त्वाची असते असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. पुण्यात आोयजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बिहार विधानसभा निवडणुकीचं एकंदर चित्र पाहिलं तर उद्या तेजस्वी यादव बहुमतानं बिहारचे मुख्यमंत्री झाले तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. कारण जनभावना महत्त्वाची असते. ती दाबता येत नाही असंही राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले, “ज्या मुलाच्या पाठीमागे सध्या पाठबळ नाही. त्याच्या घरातली माणसं तुरुगांत आहेत. मग ती कोणत्याही कारणास्तव असो. त्याच्या कुटुंबाच्या पाठीमागे इन्कम टॅक्स (Income Tax), सीबीआय (Central Bureau of Investigation – CBI) ससेमिरा लावला जात आहे. तोच तरुण मलगा हजारो लाखोंच्या सभा घेतोय आणि केंद्रीय राजसत्तेला आव्हान निर्माण करतोय. मला वाटतं बिहारच्या निवडणुकीचं एकंदर चित्र पाहिलं तर उद्या तेजस्वी यादव बहुमतानं बिहारचे मुख्यमंत्री झाले तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. कारण जनभावना महत्त्वाची असते. ती दाबता येत नाही.”

पुढं बोलताना राऊत म्हणाले, “बिहारची जशी जनभावना आता आपल्याला दिसून येते तेच महाराष्ट्रात झालं. तेच आता इतर राज्यात होईल. बिहारमध्ये नॉन भाजप सरकार बनेल.” असंही राऊतांनी सांगितलं आहे.