‘…तर ‘मंत्रीकपात’ करण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर येईल’

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यभरात कोरोनाचे संकट अधिक गडद होत चालले आहे. या संकटामुळे कदाचित मुख्यमंत्र्यांवर मंत्रीकपात करण्याची वेळ येईल असे मत   शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडले आहे. सामनाच्या रोखठोक सदरात त्यांनी  भूमिका मांडली आहे.  महाराष्ट्राचे सर्वच मंत्री आपआपल्या जिल्ह्यात कोरोना लढाईत जुंपले आणि गुंतले आहेत. अनेक मंत्र्यांनी तीन महिने मुंबईचे तोंडही पाहिलेले नाही. शपथा घेतल्या, पण मंत्रीपदाची चमक आणि धमक मिरवायची सोय नाही अशी सध्याची अवस्था आहे. जे मलाईदार खात्यांसाठी भांडत होते ते अशी खाती मिळूनही रिकामेच आहेत. हे असेच सुरु राहिले तर कामगार कपातीप्रमाणे मुख्यमंत्र्यांना मंत्रीकपात करण्याची वेळ येईल.

रोखठोक सदरातून राउत यांनी भूमिका मांडली आहे. त्यावेळी महाराष्ट्रात बेरोजगारी वाढणे हे देशाला परवडणारे नाही असे मी एका वरिष्ठ अधिकार्‍यास सांगितले. तेव्हा त्या अधिकार्‍याने एक मिश्किल भाष्य केले. मंत्रालयातही अनेकांच्या हाताला काम नाही तिथे इतरांचे काय घेऊन बसलात? कोरोनामुळे आय.ए.एस. आयपीएस अधिकार्‍यांचा एक मोठा गट कामाच्या प्रतीक्षेत उभा आहे. त्यांना काम हवे असून त्यांचा हक्क आहे. महाराष्ट्राचे सर्वच मंत्री आज आपल्या जिल्ह्यात करोना लढाईत जुंपले आणि गुंतले आहेत. अनेक मंत्र्यांनी तीन महिने मुंबईचे तोंडही पाहिलेले नाही. शपथा घेतल्या, पण मंत्रीपदाची चमक आणि धमक मिरवायची सोय नाही अशी सध्याची अवस्था आहे. जे मलाईदार खात्यांसाठी भांडत होते ते अशी खाती मिळूनही रिकामेच आहेत. हे असेच सुरु राहिले तर कामगार कपातीप्रमाणे मुख्यमंत्र्यांना मंत्रीकपात करण्याची वेळ येईल. दरम्यान, राउत यांच्या वक्तव्यामुळे राजकीय पंडितांनी भुवया उंचावल्या आहेत.