कोल्हापूर : मानाच्या गणपतीचे प्रथम विसर्जन

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन –   कोल्हापूर शहरामध्ये मानाचा समजला जाणारा श्री तुकाराम तालीम मंडळाच्या गणेश मंडळाच्या गणेश मुर्तीचे प्रथम विसर्जन करण्यात आले. तालीमशेजारीच असणाऱ्या एका कृत्रिम कुंडात गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यात आले. कोल्हापुरचे महापौर निलोफर आजरेकर यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. यावेळी महापालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी उपस्थित होते.

दरवर्षी कोल्हापुरामध्ये श्री तुकाराम तालीम मंडळाच्या गणेश मुर्तीचे प्रथेप्रमाणे विसर्जन केले जाते. हा गणपती मानाचा समजला जातो. त्यामुळे यंदाही गणेश मुर्तीचे मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले. करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून साध्या पद्धत्तीने विसर्जन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे तालमीच्या शेजारीच तयार केलेल्या कृत्रिम कुंडामध्ये गणरायाचे विसर्जन कार्यकर्त्यांकडून करण्यात आले.

यावेळी नगरसेवक संभाजी जाधव, विजय सुर्यवंशी, पोलीस निरिक्षक प्रमोद जाधव, तालमीचे अध्यक्ष शिवाजी पवार यांच्यासह मंडळांचे कार्यकर्ते, महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.