शरद पवार पैलवान ‘पूर्वी’ होते आता आम्हीच ‘वस्ताद’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन टीम – शरद पवार यांच्या तालमीत मी तयार झालो आहे. शरद पवार हे पैलवान होते. आम्हाला कोणाशी कुस्ती खेळायची नाही़ पण, सध्या देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि मी पैलवान आहे, असे उद्गार रामदास आठवले यांनी काढले.

शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सध्या पैलवानावरुन वाग्युद्ध रंगले आहे. त्याविषयी विचारले असता रामदास आठवले म्हणाले, शरद पवार हे कुस्ती संघटनेचे अध्यक्ष होते. मी त्यांच्यात तालमीत तयार झालो आहे. शरद पवार पूर्वी पैलवान होते. आता आम्हीच पैलवान आहोत. २०१९ ची कुस्ती आम्हीच जिंकणार आहे.

दोघांच्या खाऊ थाळ्या, दोघांना वाजतो मी टाळ्या
रामदास आठवले यांचे भाषण असो की पत्रकार परिषद त्यांनी कोट्या केल्या नाहीत असे होत नाही. भाजपा आणि शिवसेनेच्या थाळ्याबाबत त्यांनी अशीच कोटी केली. शिवसेनेने १० रुपये आणि भाजपाने ५ रुपयांना थाळी जाहीर केली आहे. आम्ही त्यांच्यामध्ये ८ रुपयांना थाळी देण्याचे ठरवू. दोघांच्या थाळ्या खाल्ल्यानंतर आमची थाळी ठरवू. दोघांच्या थाळी खाऊ, दोघांना वाजतो मी टाळी असे सांगताच एकच हश्शा पिकला.

वंचित आघाडी रिपब्लिकन नाव पूसून टाकत आहे. आम्ही मात्र ते जिवंत ठेवले आहे. वंचित आघाडी काढून बाळासाहेबांनी वंचितांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. जर वंचितांना सत्तेत आणायचे असेल तर आमच्याबरोबर, मोदीसोबत यावे.

राज ठाकरे हे विरोधी पक्षासाठी मते मागत आहे. पण केंद्राप्रमाणे राज्यातही विरोधी पक्ष होण्यासाठी लागणाऱ्या पात्रतेइतका जागा विरोधकांना मिळणार नाही. राज ठाकरे हे चांगल्या नकला करतात. भाषण ऐकून विकास होत नाही. उद्धव ठाकरे यांनी आपणच बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहोत, असे सिद्ध केले आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी