मुलीसोबत TikTok व्हिडीओ बनवणं पडलं महागात, भावानं नग्न करून फिरवलं मार्केटमध्ये अन् Video केला ‘व्हायरल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानच्या जयपूर स्थित जवाहर नगर परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला. एका तरुणाने एका तरुणीसह टिकटॉकवर व्हिडिओ तयार केला. यानंतर व्हायरल झालेला व्हिडिओ तरुणींच्या भावाने पाहिला. भडकलेल्या तरुणीच्या भावाने आपल्या मित्रासह त्या तरुणाला नग्न करुन पट्याने जबर मारहाण केली आणि नग्न धिंड काढली. एवढेच नाही तर तरुणीच्या भावाने हा व्हिडिओ तयार करुन सोशल मीडियावर व्हायरल केला.

घटनेवेळी टिकटॉक करणारा मार खात राहिला आणि माफी मागत राहिला, परंतु तरुणीचा भाऊ हेच म्हणत त्याला मारहाण करत राहिला की तुला खूप शॉक आहे ना व्हिडिओ तयार करण्याचा, आज तुला फेमसच करतो. दुसऱ्या दिवशी तरुणाने आपल्याला नग्न करत मारहाण करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिला आणि आपल्या नातेवाईकांसह पोलीस स्टेशन गाठले.

पीडित तरुणाने तरुणीच्या भावासह तीन जणांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच तरुणीच्या भावाकडून देखील पीडित तरुणाच्या विरोधात एससी-एसटी व पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

तरुण-तरुणीची ओळख जवाहर नगर स्थित एका हॉटेलमध्ये कामादरम्यान झाली होती. शुक्रवारी तरुणाने तरुणीसह टिकटॉकवर व्हिडिओ तयार केला होता. शनिवारी पोलिसांनी दोन्ही बाजूने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे. परंतु अद्याप व्हिडिओ तयार करणारा आरोपी फरार आहे.