‘राष्ट्रवादी’सह पवार कुटूंबामध्ये ‘उभी’ फुट, खा. सुप्रिया सुळेंनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात गेल्या काही वर्षातील सर्वात मोठा राजकीय भूकंप झाला. सकाळी 6 वाजता राष्ट्रपती राजवट काढून घेण्यात आली आणि सकाळी 8 वाजता भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर खा. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या व्हॉटस्अ‍ॅप स्टेटसला पार्टी अ‍ॅन्ड फॅमिली स्पील्ट असं स्टेटस ठेवलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि पवार कुटूंबातमध्ये उभी फूट पडल्याचं स्पष्ट झाले आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना दि. 30 नोव्हेंपर्यंत बहुमत सिध्द करण्यासाठी वेळ दिली आहे. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आपण मरेपर्यंत शरद पवारांसोबत असल्याचं सांगितलं आहे. त्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांचा समावेश आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेमके कोणते आमदार आहेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, पवार कुटूंबात आणि राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्याचं आता खा. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या ठेवलेल्या व्हॉटस्अ‍ॅप स्टेटसवरून स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Visit : Policenama.com