‘कोरोना’च्या संकटात देखील रेल्वेनं दिल्या तब्बल 56 हजार जणांना सरकारी नोकर्‍या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    कोरोनामुळे देशभरात अनेकांना नोकर्‍या गमावाव्या लागल्या आहेत.
यादरम्यान रेल्वेकडून व्यापक प्रमाणात नोकर भरती सुरु करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाने असिस्टंट लोको पायलट आणि टेक्निशियनच्या तब्बल 56 हजार जागा भरल्या आहेत.

रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, असिस्टंट लोको पायलट आणि टेक्निशियनच्या 56 हजार 378 जागांसाठी भरती झाली. निवडलेल्या उमेदवारांच्या पॅनेलला मान्यता देण्यात आली असून 40 हजार 420 उमेदवारांना नियुक्तीपत्रे देखील देण्यात आली. बाकी निवड झालेल्यांना नियुक्तीपत्र देण्याची प्रक्रिया सुरु आहे. यातील काही उमेदवारांचे प्रशिक्षण देखील पूर्ण झाले आहे. रेल्वे भरती मंडळांने 31 फेब्रुवारी ते 31 मार्च दरम्यान जाहीर केलेल्या 64 हजार 371 जागांसाठी संयुक्त भरती जाहीर केली होती. या जागांसाठी एकूण, 47 लाख 45 हजार 176 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले होते. भरतीसाठी उमेदवारांची तीन टप्प्यात चाचणी घेण्यात आली. कंम्प्यूटर आधारित परीक्षा त्यानंतर वैद्यकीय तपासणी आणि निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली गेली. यामधून 56 378 उमेदवारांची निवड केली गेली.