UNGA मध्ये PM मोदींच्या भाषणाने भारताचे जागतिक स्तरावर वाढले वजन

नवी दिल्ली: वृत्तसंस्था – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेत भाषण केले. यूनजीएमध्ये मोदींनी भाषण केल्यानंतर भारताची ताकद आणि वजन जागतिक स्तरावर वाढले आहे. या भाषणात पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला दहशतवादाबद्दल खडे बोल सुनावले तर भारत हा बुद्धांचा देश असल्याचे देखील सांगितले. मोदी यांच्या या भाषणाला जगभरातील सर्व नेत्यांनी दाद दिली असून भाषणानंतर सर्व नेत्यांनी मोदींचे उठून स्वागत केले. यामध्ये ग्रीसचे पंतप्रधान, मॉरिशसचे राष्ट्रपती आणि सिंगापूरच्या पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा देखील दिल्या.
मात्र या भाषणात मोदींनी काश्मीर मुद्द्यावर बोलणे टाळले. त्यामुळे काश्मीर मुद्द्यावर कोणत्याही प्रकारचा समझोता होणार नसल्याचे देखील त्यांनी यावेळी भाषणातून दाखवून दिले.

पंतप्रधान मोदींचा बोलबाला तर इम्रान फसला
संयुक्त राष्ट्रसंघात केलेल्या भाषणात मोदींनी दहशतवादाला टार्गेट करत पाकिस्तानचा बुरखा फाडला. तर इम्रान खान यांच्या भाषणात केवळ भारताचा द्वेष दिसून येत होता. त्याने काश्मीर मुद्द्यावरून भारतावर प्रचंड टीका केली. तसेच दहशतवादाच्या मुद्द्यावर आवाज न उठवणाऱ्या देशांवर देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
या वर्षी महात्मा गांधी यांची यावर्षी 150 वी जयंती साजरी केली जाणार असून यावर्षी जगातील सगळ्यात मोठी निवडणूक पार पडली असल्याचे देखील त्यांनी म्हटले.या दौऱ्यात मोदींनी विविध राष्ट्रांच्या प्रमुखांची देखील भेट घेतली. त्यामुळे काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या टर्कीला मोठा संदेश देखील मिळाला आहे.

Visit : Policenama.com