जेजुरी पोलीस स्टेशनकडून चोरीचे दोन गुन्हे उघडकीस

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – अडीच लाख रूपये रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल जप्त जेजुरी पोलीस स्टेशनला सप्टेंबर महिण्यामध्ये ‘नेचर डिलाईट’ दुध डेअरीच्या एका टेम्पोमधून १ लाख ३५ हजार रूपये तसेच दुसऱ्या एका टेम्पो मधून १ लाख १४ हजार ९५० रूपये चोरीस गेल्याचे दोन गुन्हे दाखल होते.

वरील दोन वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना गोपणीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाल्याने सहा. फौजदार महादेव कदम, पोलीस हवालदार विरण्णा मुत्तनवार, पोलीस हवालदार दिपक वारूळे, पोलीस हवालदार सचिन पडयाळ, पोलीस नाईक अक्षय यादव, पोलीस नाईक गणेश कुतवळ, पोलीस शिपाई महेश उगले, पोलीस मित्र नाना घोगरे यांचे पथक तयार करून गुन्ह्याचे तपास कामी पाठविले होते. वरील पथकाने दोन्ही गुन्ह्यातील आरोपी शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले सदर गुन्ह्यातील आरोपी कडून चोरीस गेलेला सूमारे अडीच लाख रूपयेचा मुद्देमाल व गुन्ह्यांत वापरलेली हिरो होंडा मोटार सायकल जप्त केलेली आहे.

सदरचा तपास मा. श्री. संदिप पाटील साहेब. अधिक्षक, मा. श्री. जयंत मिना अपर पोलीस अधिक्षक बारामती विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली व मा. श्री. अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड यांचे सुचने नुसार सदरची कारवाई करणेत आलेली आहे.

Visit : Policenama.com