तुमच्या ‘प्रगती’शी पायातील ‘चप्पल-बुटा’च ‘कनेक्शन’, फक्त ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कदाचित तुम्हाला या याबाबत माहिती नसेल की, ग्रह दोषाचा संबंध तुमच्या बुटांशी किंवा चपलेशी असू शकतो. शनीचा संबंध तुमच्या पायाशी असतो. एवढेच नाही तर बाहेर जाताना घालण्याचे बूट जेव्हा तुम्ही घरामध्ये घालता तेव्हा राहू आणि केतूचा दोष सुरु होतो. जाणून घेऊयात याबाबतचे उपाय जे तुमचे भविष्य बदलू शकते.

कोणाला न सांगता करा हा उपाय
तुमच्या कुंडलीत शनी दोष असल्यास किंवा एखादी साढेसाती सुरु असेल तर शनिवारी तुम्ही कोणास काही न सांगता मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आपल्या काळ्या लेदरचा बूट किंवा चप्पल काढा आणि निघून या. लक्षात ठेवा की हे करताना, मागे वळून पाहू नका. शनिदेवतांशी जोडलेला हा प्रयोग शनीमुळे होणाऱ्या समस्या दूर करून तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडवून आणू शकेल.

चपला किंवा बूट चोरीला गेले तर दुःखी होऊ नका
जर मंदिरात तुमची चप्पल किंवा बूट चोरीला गेले तर त्याचे दुःख करत बसु नका, कारण ज्योतिषानुसार हा तुच्यासाठी शुभ संकेत आहे. जर तुमचे पादत्राणे शनिवारी चोरी होतात तर हा खूप शुभ संकेत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार असे घडल्यास शनी दोषपासून दिलासा मिळतो.

फाटलेले बूट वापरू नका
कोणत्याही महत्वाच्या कामावेळी जसे की,एखाद्या मुलाखतीला जाताना किंवा दूरच्या प्रवासासाठी जाताना चुकूनसुद्धा फाटलेले बूट घालू नका. अशी पादत्राणे तुमच्या यशामध्ये बाधा निर्माण करतात.

दाराजवळ काढू नका बूट
आपल्या घराच्या दाराजवळ कधीही चपला बूटकाढू नका किंवा आपल्या पाहुण्यांनातसे करू देऊ नका. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवलेले शूज आपल्या चांगले भविष्य आणि समृद्धीवर परिणाम करतात.

पश्चिम दिशेला ठेवा आपले बूट
चुकून देखील आपले बूट ईशान्य दिशेला ठेऊ नका, एका व्यवस्थित पणे त्यांना पश्चिम दिशेला ठेवा.

घरात घालू नका बाहेर घालायचे बूट
बाहेर वापरण्यात येणारे बूट चपलांचा वापर घरात करू नका. बाहेरील नकारात्मक गोष्टींचा घरात यामुळे प्रवेश होऊ शकतो तसेच बूट किंवा चप्पल घालून जर कोणी घरात प्रवेश केला तर त्यांच्यासोबत राहू केतू ग्रह देखील घरात प्रवेश करतात. आरोग्याच्या दृष्टीने देखील हे हानिकारक आहे.

घरात ठेऊ नका जुने बूट
घरात जुने चपला किंवा बूट ठेवल्याने देखील नकारात्मक ऊर्जा तयार होते. ज्यामुळे समस्या तुमच्या घरातून जाण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे वापरात नसलेल्या चपला आणि बूट घरात ठेवण्यापेक्षा एखाद्याला दानं करा.

नीट पद्दतीने ठेवा बूट आणि चपला
पादत्राणे घरामध्ये विखरलेल्या स्वरूपात जाऊ नये, अन्यथा घरात तणावाची परिस्थिती निर्माण होते. ज्या लोकांच्या घरामध्ये बूट इकडे-तिकडे विखुरलेले आहेत, तिथे शनीच्या अशुभतेचा परिणाम दिसून येतो. कुटुंबातील लोक अस्वस्थ राहतात. म्हणून चप्पल बूट व्यवस्थित पद्धतीने ठेवा.

ऑफिसमध्ये नका घालू तपकिरी रंगाचे बूट
ऑफिसमध्ये तपकिरी बूट घालणे टाळा. विशेषत: बँकिंग किंवा शिक्षणाशी संबंधित लोकांनी याबाबतची विशेष काळजी घेतली पाहिजे. कॉफी किंवा डार्क ब्राऊन रंगाची पादत्राणे अशा लोकांसाठी शुभ ठरतात.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/