लासलगांव बाजार समिती 9 जुलै पर्यंत बंद

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाईन – लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समिती चे कांदा आणि धान्य लिलाव नऊ जुलै पर्यंत बंद ठेवनार असल्याची माहिती सभापती सौ सुवर्णा जगताप आणि उपसभापती प्रिती बोरगुडे व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली लासलगांव व परिसरात कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. गेल्या महिन्याच्या 27 तारखेला 53 वर्षे महिला कोरोना बाधित सापडल्याने त्यानंतर 14 जनांना कोरोनाची बाधा झाली असल्याच्या पार्श्वभूमीवर सदर निर्णय घेण्यात आला आहे.

14 पैकी दोन व्यक्तींची कोरोना मुक्त झाल्याची माहिती लासलगांव कोवीड सेंटरचे राजाराम शैंद्रे यांनी दिली.आशिया खंडातील कांद्याची प्रसिध्द असलेली बाजारपेठ लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्याने कांदा व्यापार्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

कांदा व्यापाऱ्याला कोरोनाची बाधा झाली आहे त्यामुळे लासलगाव बाजार समितीतील कांद्याचे लिलाव गुरुवारपर्यंत बंद राहणार आहे त्याबरोबर धान्य आणि भाजीपाल्याचे ही लिलाव बंद राहणार असल्याने लासलगाव बाजार समितीतील कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे . गजबजलेल्या लासलगाव बाजार समिती शुकशुकाट दिसत आहे.