लासलगाव येथे शासकीय मका खरेदी केंद्र सुरू

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन  –   लासलगाव येथे शासकीय मका खरेदी केंद्र लासलगाव विभाग खरेदी विक्री संघाच्या च्या रेल्वे स्थानकाजवळली गोदामात मध्ये सुरू करण्यात आले असून या केंद्राचे औपचारिक उदघाटन मंगळवारी(२ जून)रोजी निफाडचे तहसीलदार दिपक पाटील यांच्या हस्ते तसेच संघाचे चेअरमन नानासाहेब पाटील,लोंढे नाना,बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील मका खरेदी करण्यासाठी लासलगाव खरेदी-विक्री संघात नोंदणी करण्याचे काम सुरू झाले आहे.तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर रब्बी हंगामात मका पिकाची लागवड झाली होती.मार्चपासून लॉकडाऊनमुळे रब्बी हंगामातील मका शेतकऱ्यांकडे विक्रीअभावी पडून होती.बाजारात कमी किमतीत मका खरेदी होत असल्याने शासनस्तरावर मका खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत मागणी वाढल्याने हे शासकीय मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आले

शासकीय मका खरेदी सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या मकास उच्चतम भाव मिळणार असून यंदाच्या खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे पैसा उपलब्ध होणार आहे.नानासाहेब तुकाराम जगताप या शेतकऱ्याची उदघाटन प्रसंगी मका खरेदी करण्यात आली.या उद्‌घाटनप्रसंगी खरेदी विक्री संघाचे व्हा.चेअमन शांताराम नागरे,व्यवस्थापक प्रभाकर बोराडे,राजाराम मेमाणे,जनार्दन जगताप,राजाराम दरेकर,नितीन घोटेकर,एल के बडवर,धोंडीराम धाकराव,अनिल शिदे,शंकरराव कुटे,प्रकाश कापडी,दत्तोपंत डुकरे,सुदिन टर्ले,हिरालाल सोनारे,खरेदी कर्मचारी एस.जी.बोचरे आदी उपस्थित होते.

ऑनलाइन नाव नोंदणी खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात करण्यात येत आहे.यासाठी शेतकऱ्यांनी सातबारा,मका पिकाचा पीक पेरा रब्बी नोंद,आधारकार्ड छायांकित प्रत, बँक पासबुकची झेरॉक्स (छायांकित प्रत) सोबत आणावी. प्रती शेतकरी हेक्टरी ३० क्विंटल मर्यादेपर्यंत मका खरेदी केली जाणार आहे.यासाठी १४ टक्के ओलावा असलेला मका प्रति क्विंटल १ हजार ७६० रुपये दराने खरेदी केली जाणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like