लासलगावला कांदा लिलाव सुरळीत

लासलगाव  : पोलीसनामा ऑनलाइन  –   कांदा निर्यातबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर काल लासलगाव येथील मुख्य बाजार समितीमध्ये कांद्याचे शेतकऱ्यांकडून लिलाव बंद पाडण्यात आले होते.दिनांक १६ रोजी लासलगाव येथील कांद्याचे बाजार सुरळीत होऊन कांद्याला कांद्याला सरासरी 2500 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. गेल्या दोन दिवसाच्या पूने मध्ये कांद्याच्या सरासरी दरांमध्ये 450 रुपयांची घसरण आज दिसून आले.

देशांतर्गत बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या कांद्याच्या दरात आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला होता त्याचे पडसाद जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये दिसून आलेला होता अद्याप पर्यंत ही केंद्राकडून निर्यात बंदी उठवण्याची कुठलीही हालचाल झाली नसल्यामुळे शेतकऱ्यांबरोबर व्यापारी वर्ग अडचणीत सापडलेला आहे. व्यापारी वर्गाचा मोठ्या प्रमाणामध्ये कांदा हा बंदरावर आणि बांगलादेश जास्त वेळेवर अडकून पडलेला आहे

गेल्या १५ दिवसांपासून कांद्याला समाधान कारक दर मिळत होते. किरकोळ बाजारात एक किलो कांद्याला ४० रुपये दर मिळत होता. निर्यातबंदीमुळे मात्र शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. कांदा निर्यातबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर लगेचच देशांतर्गत बाजारपेठेतील दर कमी होतात, असा अनुभव आहे. केंद्र सरकारने सोमवारी अचानक कांदा निर्यातबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रासह अन्य राज्यांमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून कांदा वगळण्याच्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर व्हायच्या आतच वाढणाऱ्या कांद्याच्या दराला आळा बसविण्यासाठी केंद्र सरकारने दिनांक १४ रोजी निर्यात बंदीची घोषणा केली आणि त्याचे पडसाद येथील बाजार समितीत कांदा भावावर पडले.

मुळात सध्या विक्रीसाठी येणाऱ्या उन्हाळ कांदा हा एप्रिल आणि मे महिन्यामध्ये चाळीस साठवून ठेवलेला होता मात्र बदलत्या हवामानामुळे या कांद्याच्या प्रतवारी खराब झालेली आहे त्यामुळे मिळणाऱ्या दरातून कुठेतरी उत्पादन खर्चही निघणार होता मात्र केंद्र सरकारने फक्त त्याचा विचार करून एकतर्फी निर्णय घेतल्याची टीका शेतकरी वर्गाकडून केली जात आहे

येथील मुख्य बाजार समितीत उन्हाळ कांद्याला किमान ११०० सरासरी २५०० तर जास्तीत जास्त २९५० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला