दारूबंदीवरून रुपाली चाकणकरांची फडणवीसांवर टीका, म्हणाल्या – ‘नशा दौलत का ऐसा भी क्या…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाकाळात राज्यातील आरोग्याच्या स्थितीवर लक्ष देणे सोडून महाविकास आघाडी सरकारने चंद्रपुरातील दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून या सरकारची प्राथमिकता काय आहे, हेच या निर्णयातून दिसते. त्यामुळेच हा निर्णय अतिशय दुर्दैवी असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर Rupali Chakankar यांनी फडणवीसांवर घणाघाती टीका केली आहे. याबद्दल त्यांनी एक ट्वीट करत फडणवीसांचा जुना व्हिडिओदेखील शेअर केला आहे. दारूबंदी तो बहाणा है, मालपाणी निशाना है, नशा दौलत का ऐसा भी क्या, के तुझे कुछ भी याद नहीं, क्या हुआ तेरा असे म्हणत फडणवीसांवर टीकास्त्र सोडले आहे.

चंद्रपुरात दारूबंदी होती त्यावेळी मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री सुरू होती. त्यामुळे त्यांना मालपाणी मिळत होते. पण दारूबंदीचा निर्णय उठवल्यामुळे त्यांचे मालपाणी बंद होईल, अशा शब्दात रुपाली चाकणकर Rupali Chakankar यांनी फडणवीसांवर टीका केली आहे. चाकणकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, दारूबंदी तो बहाणा है, मालपाणी निशाना है, नशा दौलत का ऐसा भी क्या, के तुझे कुछ भी याद नहीं, क्या हुआ तेरा, रुपाली चाकणकर यांच्या या ट्वीटमुळे राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे यावर आता फडणवीस काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Also Read This : 

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन, बॉम्बशोधक पथक दाखल; तपास सुरु

लैंगिक संबंध ठेवल्यानंतर कशी आणि किती दिवसात गर्भधारणा होते ? जाणून घ्या

ब्लॅक, व्हाईट फंगसनंतर भारतात अ‍ॅस्परगिलोसिसची प्रकरणे आली समोर; जाणून घ्या लक्षणं, कारणे आणि बचावाचे उपाय

शिवसेनेचे पदाधिकारी एकनाथ पाटील यांचे स्पष्टीकरण, म्हणाले – ‘… तो Video 2 वर्षांपूर्वीचा, भाजपाने घरगुती वादाचा गैरफायदा घेऊ नये’