येत्या लोकसभा निवडणुकीत बारामतीची जागा पडली तर पुस्तक लिहावे लागेल : चंद्रकांत पाटील 

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीची जागा जर पाडली, तर आपण काय काय केले यासंदर्भात पुस्तक लिहावे लागेल. असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले. तसेच कार्यकर्त्यांनी तसा प्रचार प्रसार जळगावातही करावा असे आवाहनही त्यांनी केले.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. ११ एप्रिल रोजी देशातील पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. आता १८ एप्रिल रोजी  दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याचदरम्यान, जळगाव जिल्यातील भुसावळ, यावल, जळगाव व भडगाव येथे  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी  बैठका घेतल्या. त्यावेळी माध्यमांच्या सर्व्हेंनुसार आपणच निवडून येऊ. पण त्यामुळे झोपून राहू नका. आपल्याला यंदा ३७३ जागांचे टार्गेट आहे. मतदानाची टक्केवारी कमी झाली तर  भाजपासाठी ती धोक्याची घंटा ठरेल. असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, आगामी लोकसभा निवडणुकीत  आपण बारामतीवर जास्त लक्ष केंद्रीत केले आहे. माध्यमांवर जे सुरू आहे त्यावरून आपल्याला अंदाज येत असेलच. तिथे जोमाने प्रचार सुरू आहे. बारामतीची जागा जर पाडली, तर आपण काय काय केले यासंदर्भात पुस्तक लिहावे लागेल. असेही त्यांनी म्हंटले.

You might also like