‘बसंती’च्या प्रचारासाठी ‘विरू’ उतरला प्रचाराच्या रिंगणात

आग्रा : वृत्तसंस्था – लोकसभेच्या निवडणुकांमध्ये प्रचारासाठी नवनवे हातखंडे वापरले जातात. त्यात मागील काही दिवसात हेमा मालिनी यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. शेतात काम करतानाचे हे फोटो होते. त्यावरून त्यांना ट्रोलही करण्यात आले होते. मात्र आता बसंतीच्या प्रचारासाठी थेट विरुने मैदानात उडी घेतली आहे. म्हणजे हेमा मालिनी यांच्या प्रचारासाठी अभिनेता धर्मेंद्र प्रचाराच्या रिंगणात उतरला आहे. मथुरामध्ये हेमा मालिनीचा प्रचार करण्यासाठी धर्मेंद्र यांनी सभेला संबोधित केले.

मी स्वत: शेतकऱ्याचा मुलगा आहे. हेममालिनी या शहराच्या विकासासाठी प्रयत्न करत आहे. हेमा मालिनीचा विजय म्हणजे मथुरावासियांचा विजय आहे. शेतात घाम गाळणारा शेतकरी गरज भासल्यास देशाच्या रक्षणासाठीही सज्ज असतो, असं त्यांनी यावेळी म्हटलं. तसंच जाट समुदायाला मतदान करण्यासाठी आवाहन ही त्यांनी केली.

धर्मेंद्र यांची त्यांच्या काळात मोठा चाहता वर्ग होता. तसाच आजही त्यांचा मोठा चहता वर्ग आहे. त्यामुळे उन्हातही लोकांनी फक्त धर्मेंद्रला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.