चंद्रपूर : अटीतटीच्या लढतीत सुरेश धानोरकर विजयी

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार हंसराज अहिर यांना भाजपाने पुन्हा उमेदवारी दिली. या मतदारसंघातून अहिर हे चारवेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले सुरेश धानोरकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. या अटीतटीच्या लढतीत सुरेश धानोरकर हे ५१ हजार ४९४ एवढ्या मताधिक्याने विजयी झाले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी हंसराज अहिर यांनी ४ लाख ३५ हजार २११ एवढी मते मिळवून दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. ही आकडेवारी निवडणूक आयोगाच्या साईटवरील आहे. यामध्ये किंचीत फरक पडू शकतो.

चंद्रपूर लोकसभा मतदार संघात तिरंगी लढत झाली. भाजपचे हंसराज अहिर, काँग्रेसचे सुरेश धानोरकर आणि वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र महाडोळे यांच्या लढत झाली. मात्र, खरी लढत झाली ती हंजराज अहिर आणि सुरेश धानोरकर यांच्यामध्ये.
चंद्रपूरमध्ये १९ लाख ८ हजार ५५५ मतदारांची संख्या असून १२ लाख ३४ हजार १०१ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुषांचे प्रमाण ६६.१४ टक्के आहे तर महिलांचे प्रमाण ६३.०९ टक्के आहे. या मतदारसंघामध्ये एकूण ६४.६६ टक्के मतदान झाले आहे. २०१४ च्या तुलनेत चंद्रपूरमध्ये मतदानाची टक्केवारी केवळ १.४१ टक्क्यांनी वाढली आहे.

उमेदवार                              पक्ष                                मिळालेली मतं
हंसराज अहिर                    भाजपा                                 ४३५२११
सुरेश धानोरकर                 काँग्रेस                                 ४८६७०५
राजेंद्र महाडोळे        वंचित बहुजन आघाडी                      १०३२७०

सुशील सेगोजी वासनिक बसपा १०५५२
चंद्रपूरमधील एकूण मतदान – १९ लाख ८ हजार ५५५
चंद्रपूरमध्ये झालेले मतदान – १२ लाख ३४ हजार १०१

You might also like