अविवाहितांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी पार्थला निवडू द्या : अजित पवार

पुत्रप्रेमापोटी अजित पवार हतबल विरोधकांची टीका

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – अविवाहित वर्गाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तरी पार्थला निवडून द्या, अशी केवीलवाणी हाक राष्ट्रवादीचे नेते आणि आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांचे वडील अजित पवार यांनी विद्यार्थी मेळाव्यात केली आहे. पुत्रप्रेमापोटी हतबल झाल्याने अशी वक्तव्ये अजित पवार करीत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

लोकसभेत काही अविवाहित खसदार ही हवेत. अविवाहित वर्गाचे प्रतिनिधित्व करणारा सदस्य ही लोकसभेत असायला हवा, असे अजित पवार यांनी म्हटले. तर कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, असे म्हणत त्यांनी साक्षी महाराजांवर निशाणा साधला.

लोकसभेत अविवाहितांचे प्रश्न मांडणारा खासदार असायला हवाच, त्यांच्याही अनेक समस्या आहेत. त्यामुळे अविवाहित पार्थ पवार निवडून जावा, म्हणून हा खटाटोप सुरू असल्याचे अजित पवार यांनी यावेळी म्हटले. यावर टीका करताना शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे म्हणाले, पुत्रप्रेमापोटी हतबल झाल्याने अशी वक्तव्ये करतात. अशा पक्षाकडून जनतेने काय शिकावं, असा प्रश्न आहे.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचं शिक्षण बारावी आणि त्या विद्यापीठाच्या बॉस आहेत. हा दाखला देत मावळ युतीचे श्रीरंग बारणे हे दहावी नापास उमेदवार असण्याकडे पवारांनी बोट दाखवलं. त्यामुळे उच्चशिक्षित पार्थ पवारांना निवडून देण्याचं आवाहन अजित पवारांनी केलं.