मला अजूनही भाजपकडून ऑफर , मात्र… : उदयनराजे भोसले

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – मला अजूनही भाजपकडून ऑफर आहे , मात्र केवळ जनतेमुळे मी राष्ट्रवादीत आहे असे विधान  खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. उदयनराजे यांना सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी निश्चित झाली आहे.  त्यानंतर त्यांनी प्रचाराला सुरुवात केली असून , साताऱ्यातील कोरेगावमध्ये पार पडलेल्या सभेत उदयनराजे बोलत होते.
आपल्या आक्रमक शैलीमुळे, तसेच विशिष्ट डायलॉगबाजीमुळे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले नेहमीच चर्चेत असतात . साताऱ्यातून तिकीट मिळाल्यानंतरही लोकसभेच्या उमेदवारीविषयी बोलताना उदयनराजे म्हणाले की , ‘मला अजूनही भाजपकडून ऑफर आहे. मी केवळ जनतेमुळे राष्ट्रवादीत आहे. नाहीतर मी तडजोड ,सेटलमेंट करून कधीच रिकामा झाला असतो.’
देशाचं माहीत नाही, साताऱ्यात मीच जिंकणार’ –
‘येत्या लोकसभा निवडणुकीत देशात काय होईल मला माहीत नाही, पण साताऱ्यात मीच जिंकणार,’ असा विश्वास साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी बोलून दाखवला आहे.  ‘माझ्यावर कुणीही नाराज नाही. कारण माझ्याकडं येणाऱ्या प्रत्येकाचं मी काम करतो. ते करताना मी पक्ष बघत नाही. व्यापक दृष्टिकोन ठेवून काम करतो,’ असंही  उदयनराजे म्हणाले.

You might also like