मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये सर्वात जास्त गुन्हे : शरद पवार

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन ( अब्बास शेख ) – या वर्षी राज्यातील सर्वात जास्त गुन्हे नागपुरात आणि मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात झाले आहेत. ही तक्रार तेथील नागरिकांचीच आहे. ज्यांच्यात घरातील गुन्ह्यांना आवर घालण्याची कुवत नाही, त्यांच्यात राज्य गुन्हेगारांच्या हातून मुक्त करण्याची धमक कशी असेल अशी टिका राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी केली ते दौंड तालुक्यातील वरवंड येथे राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश थोरात यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.

पवार यांनी पुढे बोलताना यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील व आम्ही चालविलेले राज्य पुन्हा एकदा उभ करायचे असेल.तर भाजप-शिवसेनेचा पराभव करायला पाहिजे त्यासाठी सर्वांनी जोमाने कामाला लागले पाहिजे असे आवाहन केले. भीमा पाटस कारखाण्यावर टिका करताना आपण दौंडवरून बारामतीला जाताना ज्यावेळी भीमा पाटस कारखान्याकडे पाहतो त्यावेळी आपल्याला रात्रीची झोप लागत नाही असे सांगितले.

खा.सुप्रिया सुळे यांनी बोलताना निवडणूका आल्या की दिल्लीवरून मोदी शहा येतात आणि पवार, पवार करतात पण ज्यावेळी दुष्काळ, पूर येतो त्यावेळी त्यांना महाराष्ट्र दिसत नाही अशी टीका केली. रमेश थोरात यांनी बोलताना आजच्या सभेला जमलेला जनसमुदाय हा आपला विजय निश्चित असल्याचा सांगून जात आहे त्यामुळे आता तालुक्यात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करत विद्यमान आमदार राहुल कुल यांच्यावर टीका केली. या सभेला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी आमदार रमेश थोरात, महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, वैशाली नागवडे, आप्पासाहेब पवार, वीरधवल जगदाळे, पांडुरंग मेरगळ, विकास ताकवणे आदी उपस्थित होते.

Visit : Policenama.com