Low Cost Fruit And Vegetables Benefits | सर्व प्रकारच्या रोगांचे शत्रू आहेत ‘ही’ 5 स्वस्त कलरफुल फळे आणि भाज्या, आराग्यात ताजेपणा येण्यासाठी रोज खा

नवी दिल्ली : Low Cost Fruit And Vegetables Benefits | हार्वर्ड मेडिकल हेल्थच्या न्यूट्रिशनिस्ट, डॉ. नॅन्सी ओलिव्हेरा सांगतात की जर निरोगी राहायचे असेल, तर रोजच्या आहारात वेगवेगळ्या रंगांची दोन फळे, दोन भाज्या आणि एका लीन प्रोटीन प्रॉडक्टचा समावेश करा. (Low Cost Fruit And Vegetables Benefits)

म्हणजेच जर तुम्ही दिवसा कोबी-बटाट्याची भाजी खाल्ली असेल तर रात्री हिरवी भाजी नक्की खा.

बीन्स किंवा शेंगभाज्या –

रोजच्या आहारात बीन्स किंवा शेंगभाज्या घ्या. या भाज्यांमध्ये डाएट्री फायबरचे प्रमाण जास्त असते आणि ते अँटिऑक्सिडंट्स युक्त असते. शरीरात जितके जास्त अँटीऑक्सिडंट्स जातील तेवढी रोगांशी लढण्याची क्षमता वाढते. (Low Cost Fruit And Vegetables Benefits)

स्ट्रॉबेरी –

स्ट्रॉबेरी किंवा कोणत्याही प्रकारच्या बेरीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात जे रोगांशी लढण्याची क्षमता वाढवतात. लाल रंगाच्या स्ट्रॉबेरीमध्ये इतर अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात, जे पूर्णपणे हेल्दी फूड आहे आणि अनेक रोगांपासून संरक्षण करतात.

हिरव्या भाज्या –

हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या मते, दररोज किमान एकदा तरी हिरव्या भाज्यांचे सेवन करावे. हिरव्या भाज्यांमध्ये फ्लेव्होनॉइड असते ज्यामध्ये कॅन्सरपासून बचाव करण्याची क्षमता असते. हिरव्या भाज्या रोगांपासून संरक्षण करतात, तसेच मेटाबॉलिज्म देखील वाढवतात.

सफरचंद –

निरोगी राहायचे असेल तर रोज एक सफरचंद खा. सफरचंदाच्या सेवनाने फुफ्फुसे आणि हृदय मजबूत होते.
याशिवाय अस्थमा, वेट लॉस, ब्रेन हेल्थ, इम्युनिटी आणि आतड्यांचे आरोग्य यासाठी ते लाभदायक आहे. सफरचंदामुळे ब्लड शुगर सुद्धा कमी होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mouni Roy | अभिनेत्री मौनी रॉयच्या बिकिनी फोटोंनी लावली सोशल मीडियावर आग; मालदीवमध्ये करतीये व्हेकेशन एन्जॉय

Pune Crime News | अश्विनी क्लासिक सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला शस्त्राचा धाक दाखवून घरफोडी, कोंढव्यातील NIBM Road वरील घटना

Mera Bill Mera Adhikar द्वारे कसे जिंकू शकता १ कोटी रुपयांपर्यंत बक्षीस, जाणून घ्या पूर्ण पद्धत

Janhvi Kapoor | जान्हवीच्या क्रॉप टॉपने वेधले उपस्थितींचे लक्ष; फोटो व्हायरल