मान्सूननं पकडली स्पीड ! आगामी 24 तासात ‘या’ राज्यांमध्ये होणार मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  उन्हाळ्याने त्रस्त झालेल्या लोकांसाठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय हवामान विभागाच्या रिपोर्टनुसार दक्षिण पश्चिम मान्सूनला आणखी पुढे सरकण्यासाठी चांगली स्थिती निर्माण होत आहे. विभागाच्या माहितीनुसार पुढील 48 तासात बंगालच्या खाडीवर कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पुढील 24 तासात देशातच्या अनेक राज्यात जोरदार पाऊस होऊ शकतो. पूर्वेकडील वार्‍यांमुळे 12 जून आणि 13 जून रोजी दिल्ली-एनसीआरमध्ये पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार ते जाणून घेवूयात…

पश्चिम यूपीमध्ये आता हवामानात चढ-उतार कायम राहील. मागील 48 तासापासून उष्णता जास्त जाणवत होती, परंतु मान्सूनपूर्व पावसामुळे युपीच्या अनेक भागात पुढील 24 तासात अधून-मधून पावसाच्या सरी पडू शकतात. भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे की, उष्णता वाढल्याने कमी दाब निर्माण होऊन अचानक जोरदार पाऊस होऊ शकतो. हा पाऊस लोकांना गरमी आणि पिकांसाठी दिलासादायक ठरेल.

9 ते 11 जूनपर्यंत ओडिसात बरसणार

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार 9 ते 11 जूनपर्यंत ओडिसा, उत्तर किनारा आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो. याशिवाय 10 आणि 11 जूनरोजी विदर्भ, गंगीय पश्चिम बंगाल आणि गुजरातमध्ये पाऊस होऊ शकतो.

केव्हा कोणत्या राज्यात पोहचणार मान्सून

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बिहारमध्ये 15 ते 20 जूनदरम्यान मान्सून धडकण्याची शक्यता आहे. तर झारखंडमध्ये मान्सून 15 जूनपर्यंत पोहचेल. दिल्लीत तो 20 जूनपर्यंत दाखल होऊ शकतो. तसेच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात सुद्धा 20 जूनच्या दरम्यान मान्सून येऊ शकतो.