रोहित पवार यांना धक्का देण्यासाठी जोरदार ‘व्यूहरचना’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – कर्जत-जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांना मोठा झटका बसण्याची चिन्हे आहेत. मंत्री राम शिंदे हेच नव्हे, विखे पिता-पुत्रांनीही रोहित पवार यांच्या पराभवासाठी जोरदार व्यूहरचना आखली आहे. तसेच बाहेरचे व स्थानिक असा संघर्षाचा फटका रोहित पवारांना बसू शकतो, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. स्थानिक विरुद्ध बाहेरचे अशी चर्चा तालुक्यात रंगली आहे. त्यामुळे रोहित पवार समर्थक अस्वस्थ झाले आहेत.

कर्जत-जामखेड मतदारसंघाकडे जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. पवार कुटुंबियातील भावी वारसदार रोहित पवार हे पालकमंत्री राम शिंदे यांच्याविरुद्ध निवडणूक रिंगणात आहेत. रोहित पवार यांनी मोठी ताकद लावली आहे. मात्र त्यांच्या प्रचारासाठी जिल्ह्यातील कार्यकर्ते अधिक सक्रिय दिसत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशीही स्थानिक लोकांची संख्यापेक्षा जास्त असल्याचे बोलले जाते. दुसरीकडे पालकमंत्री राम शिंदे यांनी मोठी ताकद लावली आहे. त्यामुळे रोहित पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे झाल्यास पवार कुटुंबियांच्या पार्थ पवार यांच्यानंतर आणखी एक मोठा झटका बारामतीच्या पवार कुटुंबियांना बसू शकतो. त्यामुळे पवार यांनी जोरदार ताकद लावली आहे. शिंदे यांनाही निवडणूक सोपी नाही. मात्र स्थानिक विरुद्ध बाहेरचे या लढाईत संघर्ष अधिक शिगेला गेल्याचा फायदा शिंदे यांना बसू शकतो.

कर्जत-जामखेड मतदारसंघाकडे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखे यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. पवार कुटुंबीय याबद्दल असलेला रोषाचा वचपा काढण्यासाठी विखे कुटुंबिय अधिक सक्रिय झाले आहे.

Visit : Policenama.com