भिवंडीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षाचा ‘राजीनामा’, निवडणूकीत चांगलीच ‘रंगत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – निवडणुकीच्या तोंडावर सुरु असलेले पक्षांतर, राजीनाम्याचे सत्र अद्यापही सुरूच आहे. भिवंडी पूर्व व पश्चिम मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी पक्ष सोडला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत भिवंडी मतदारसंघातील वातावरण तापले आहे.

भाजपचे शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तर राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष खालिद गुड्डू यांनी एमआयएम पक्षात प्रवेश केला आहे.काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससाठी भिवंडी शहरातील एक तरी जागा द्यावी, अशी मागणी अनेकदा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह नेते मंडळींकडून करण्यात येत होती. मात्र काँग्रेसने भिवंडी पश्चिम मतदार संघातून शहर अध्यक्ष शोएब गुड्डू यांना उमेदवारी जाहीर केली होती तर भाजप शहराध्यक्ष असलेल्या संतोष शेट्टी यांना शेवटच्या क्षणाला भिवंडी पूर्व मधून काँग्रेसची उमेदवारी दिली गेली. त्यामुळे अखेर राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष खालिद गुड्डू नाराज झाले त्यांनी एमआयएम पक्षात प्रवेश केला आहे.

भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले संतोष शेट्टी यांना भिवंडी पूर्व मधून काँग्रेसची उमेदवारी दिली आहे. संतोष शेट्टी यांना युतीतर्फे निवडणूक लढणाऱ्या शिवसेना उमेदवार आमदार रुपेश म्हात्रे यांना आता काँग्रेसचे संतोष शेट्टीं यांचे मोठे आव्हान आहे. भिवंडी पूर्वचे शिवसेना आमदार रुपेश म्हात्रे तिसऱ्यांदा आपलं नशिब आजमावत आहेत. भिवंडी पश्चिममधून भाजप आमदार महेश चौघुले याना काँग्रेसने शोएब खान यांचं आव्हान असणार आहे. शोएब खान यांना काँग्रेसने पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे.

Visit : Policenama.com