‘मी महाराष्ट्र कुस्ती संघटनेचा अध्यक्ष’, शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना ‘ओपन चॅलेंज’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेच्या निवडणूक प्रचारातील घमासान आता सुरु झाले आहे. सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना रंगू लागला आहे. आरोप प्रत्यारोप व्हायला सुरुवात झाली आहे. कुस्ती लढायला समोर पैलवान नाही. समोर कोणी चांगलं लढायला नसल्यानं निवडणूक लढवण्यात मजा येत नाही. पवार साहेब नटरंग सारखे हातवारे करायला लागले आहेत. असं म्हणत बार्शीमधील पवारांच्या हातवाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी चांगलीच टीका केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात आरोप प्रत्यारोपांचे चांगलेच घमासान सुरु आहे. अहमदनगरमधील एका सभेत बोलताना शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे, ते म्हणतात मुख्यमंत्री म्हणताहेत इथं कुस्ती खेळायला पैलवानच नाही, जर समोर कोणी नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा राज्यात एवढ्या सभा घेण्यासाठी येतायेत कशाला असा सवाल पवारांनी यावेळी उपस्थित केला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमचे पैलवान तेल लावून तयार असल्याचे विधान केले होते याला उत्तर देताना पवार म्हणाले, बाळा . . मी महाराष्ट्र कुस्ती संघटनेचा अध्यक्ष आहे. राज्यात जेवढ्या तालमी आहेत त्यातली पैलवान माझ्या नेतृत्वाखाली मोठे झाले आहेत. असा टोला पवारांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. अनेक दिवसांपासून फडणवीस आणि पवार यांच्यात प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगल्याचे पहायला मिळत आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी