मंत्रिमंडळात आदित्य ठाकरेंना मिळू शकते ‘ही’ मोठी जबाबदारी, जाणून घ्या

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात आज 36 मंत्री मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि आमदार आदित्य ठाकरे देखील कॅबिनेटमध्ये सहभागी झाले आहेत. तसेच आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्री कार्यालयाच्या विभागाची (सीएमओ) जबाबदारी उद्धव ठाकरे सोपावू शकतात.

पंतप्रधान कार्यालयांच्या धर्तीवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सीएमओ बनवण्याचे सांगितले आहे. या विभागाची जबाबदारी आदित्य ठाकरे यांच्याकडे सुपूर्त करण्यात येईल असे मानले जात आहे. जेणेकरुन भविष्यात मोठ्या भूमिकेसाठी आदित्य ठाकरे तयार होऊ शकतील.

ADV

निवडणूकीदरम्यान आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केले गेले होते. शिवसेनेच्या अनेक प्रचाररॅलीमध्ये आदित्य ठाकरेच मुख्यमंत्री असे नारे लावले जात होते. परंतु भाजप-शिवसेना युतीत फिसकटल्यानंतर आणि महाविकासआघाडी स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची संधी देण्यात आली.

अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केली. मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार असा प्रश्न विरोध उपस्थित करत होते. परंतु आज अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. त्यात अजित पवार यांच्याच गळ्यात उपमुख्यमंत्री पदाची माळ पडली. यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामध्ये आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या समर्थकामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

23 नोव्हेंबर रोजी अजित पवारांनी भाजपबरोबरच जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र बहुमत सिद्ध न झाल्यानं देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता आणि सरकार कोसळले. मात्र आता पुन्हा एकदा अजित पवार यांनी ठाकरे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

त्यापाठोपाठ अशोक चव्हाण यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांचे नाव आदर्श घोटाळ्यात पुढे आले होते. ते स्वता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/