विधानसभा 2019 : कणकवलीत राणेंचा पराभव ‘नक्की’ तर शिवसेनेचा विजय ‘पक्का’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कणकवलीत नितेश राणेंचा पराभव होणार अन् शिवसेनेचा विजय पक्का आहे असा विश्वास शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांनी व्यक्त केला आहे. राज्यात भाजप शिवसेनेची जरी युती झाली असली तरी कणकवली विधानसभा मतदारसंघात ते आमनेसामने आले होते. नारायण राणे यांचे अत्यंत निकटवर्ती सहकारी मानले जाणाऱ्या सतीश सावंत यांनी निवडणुकीपूर्वी स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला होता.

निवडणूक निकालाविषयी बोलताना सतीश सावंत म्हणाले की, ‘2004 पासून नारायण राणे जो अंदाज सांगतात तो नेहमी उलट लागतो हे चित्र आहे. माझं जे व्हिजन आहे ते मी लोकांसमोर मांडले आहे. मला संधी द्यायला हवी ती संधी शिवसेनेने दिली आहे. कणकवलीत जेव्हा मी 4ऑक्टोबरला फॉर्म भरला त्याच दिवसापासून माझा विजय झाला आहे. त्यामुळे कणकवलीची जागा शंभर टक्के शिवसेना जिंकणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिन्ही जागांवर शिवसेनेचा विजय होणार आहे. ‘

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 288 मतदारसंघांमध्ये काल सोमवारी मतदान पार पडले. राज्यभरात युतीत लढणारी भाजपा-शिवसेना या मतदारसंघात आमनेसामने आल्यामुळे राज्याचे लक्ष या मतदारसंघाच्या निकालाकडे लागले आहे. कणकवली मतदारसंघात 60 टक्क्यांच्या वर मतदान झालं आहे.

Visit : Policenama.com