Maharashtra Navnirman Sena | ‘…तर त्यांच्या तंगड्या तोडून हातात देऊ’, मनसेचा पाकिस्तानी कलाकारांना खळ्ळखट्याकचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एकीकडे भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यामुळे (India vs Pakistan Cricket Match) हे दोन्ही देश आमने-सामने येणार असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी पाकिस्तानी खेळाडू आणि कलाकारांना (Pakistan Artists) सज्जड दम दिला आहे. पाकिस्तानी कलाकार भारतीय चित्रपट किंवा मालिकांमध्ये दिसले तर खळ्ळखट्याक केला जाईल, असा इशारा मनसे नेते (Maharashtra Navnirman Sena) खोपकर यांनी दिला आहे. त्यांनी ट्विट करुन त्यांनी ही सूचना वजा धमकी भारतीय चित्रपट आणि मालिका निर्मात्यांना दिली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) नेते अमेय खोपकर यांनी ट्विटमध्ये म्हटले की, भारतात अशांतता माजवण्यासाठी सतत कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानची नियत पाक नाही हे ढळढळीत सत्य आहे. पाकिस्तानने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात निरपराध भारतीयांचे बळी गेले. काहीजण हे विसरले असले तरी आम्ही विसरुच शकत नाही. म्हणूनच फक्त खेळाडूच नाही तर पाकिस्तानी कलाकारांना आमचा विरोध कायम आहे याची आठवण करुन देतोय. पाकिस्तानी कलाकार भारतीय सिनेमांमध्ये किंवा सिरीजमध्ये काम करणार असतील तर त्यांच्या तंगड्या तोडून त्यांच्याच हातात देऊ. त्याची जबाबदारी संपूर्णपणे संबंधित निर्मात्यांची राहील.

मनसे नेते (MNS) अमेय खोपकर यांनी अनेकवेळा ट्विटरच्या माध्यमातून पाकिस्तानी कलाकारांवर निशाणा साधला आहे. याआधी त्यांनी महिन्याभरापूर्वी ट्विट केलं होतं. त्यात म्हटले होते की, बॉलिवडूमधील काही निर्मात्यांना पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आलाय, असं कानावर येतंय. म्हणूनच पुन्हा एकदा आम्ही स्पष्ट शब्दात इशारा देतोय की फक्त मुंबईच काय, हिंदुस्थानातील कोणत्याही भाषेतल्या कलाकृतीत पाकिस्तानी कलाकार दिसला तर त्याचे गंभीर परिणाम संबंधित निर्मात्यांना भोगावे लागतील, असा इशारा खोपकर यांनी दिला होता.

Web Title :  Maharashtra Navnirman Sena | mns amey khopkar warned then we will break the shackles of pakistan artists and hand them

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा