Maharashtra Politics News | ‘अजित पवारांना तेव्हापासूनच भाजपमध्ये जायचं होतं’, शिंदे गटाचा मोठा गौप्यस्फोट

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | आम्ही 2019 ची निवडणूक युतीत लढलो. निकालानंतर संर्व आमदार मातोश्रीवर गेलो. आम्ही तिथे गेल्यावर आम्हाला समजलं की भाजपसोबत जायचं नाही, परंतु आमचे सुरुवातीपासून म्हणणं होतं की, भाजपसोबत जावे. अजित पवार (Ajit Pawar) हे देखील आधीपासूनच भाजपसोबत (Maharashtra Politics News) जायला तयार होते, असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Shinde Group MLA Sanjay Shirsat) यांनी केला आहे. शिरसाट यांच्या गौप्यस्फोटामुळे राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.

 

लवकरच मंत्रिमंडळ विस्तार

यावेळी बोलताना संजय शिरासाट यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रतिक्रिया दिली. येत्या आठ ते दहा दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) होणार आहे. एवढच नाही तर एकूण 20 आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिला जाणार असल्याचे शिरसाट यांनी सांगितले. शिरसाट (Maharashtra Politics News) यांच्या दाव्यामुळे राज्यातला रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पत्रकार परिषदेमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर होईल असे म्हटले होते.

 

संजय राऊत सुसंस्कृत नाहीत

संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर (Sanjay Raut) निशाणा साधला. संजय राऊत यांच्यामुळे दारोदार भिक मागण्याची वेळ आली. संजय राऊत सुसंस्कृत नाहीत. त्यांना कळायला हवं होतं राज्यपालांशी कसं बोलावं. ते जे काही राज्यापालांना बोलले ते त्यांना बाळासाहेबांनी शिकवलं होतं का?असा सवाल शिरसाट यांनी उपस्थित केला.

 

पहाटेच्या शपथविधीवर भाष्य…

संजय शिरसाट म्हणाले, पहाटेचा शपथविधी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना धडा शिकवण्यासाठी झाला होता हे बरोबर आहे. त्यात काहीच चुकीचं नाही. मुळात तुम्ही भाजपसोबत (BJP) युतीत निवडणूक लढता. प्रचारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा फोटो लावून लोकांची मतं मागता. प्रत्येक मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेच्या (Shivsena) मतांवर तुम्ही निवडणूक लढलात आणि जिंकलात. मात्र, निवडणुकीच्या निकालानंतर तुम्ही काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीसोबत (NCP) जाता.

 

Web Title :- Maharashtra Politics News | big-claim-of-shinde-group-regarding-ajit-pawar-chhatrapati-sambhaji-nagar-Shinde Group MLA Sanjay Shirsat

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Supriya Sule | मोफत तिकिटासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची धमकी ! अमोल कोल्हेंबरोबर घडलेल्या प्रकाराबाबत
सुप्रिया सुळेंची नाराजी; म्हणाल्या – ‘खासदारांना अशी वागणूक तर…’

Maharashtra Politics News | पहाटेच्या शपथविधीवरुन शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान, म्हणाले – ‘पहाटेचा शपथविधी…’

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti | पुढील वर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंती शासनाच्यावतीने मोठ्या
प्रमाणात साजरी करणार; किल्ले पुरंदर येथील शासकीय जयंती कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा